ही कोरियन सिरीज. सगळ्याच कोरियन सिरीजसारखी १६ तासांची. १६ तास खिळवून ठेवण्याइतकी चांगली गोष्ट. साध्या गोष्टीत, रोजच्या दिनक्रमांत चढउतार असलेली. कोरियन सिरीजमध्ये एलियन आला किंवा कोणी नवीन शेजारी आला तरी ते drama सारखाच treat करतात याची मला गंमत वाटते. या सिरीजची सुरुवात तशी बोअर होत होती पण त्याच्या titles मध्ये पुस्तकाची पानं होती म्हणून ती बघायला घेतली. पहिला एपिसोड १०-१५ मिनिटं नीट बघितला पण मग नंतर मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात केली. मला हा कलाकृतीचा अपमान वाटत नाही. ओढून ताणून सगळ्यांनी त्यांची इंद्रियं कलाकृतीला खिळवून ठेवायची जबरदस्ती मला मान्य नाही. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य असावं. माझं वागणं justify करायला मी असं म्हणत नाहीये. सहज म्हणतीये. जे मनापासून वाटतं ते. तर मी फोनवर गेम खेळत होते पण दोन माणसांची भेट, त्यांचं नातं इतक्या वेगळ्या पद्धतीनी त्यांनी सुरु केलं की मी फोन ठेवून दिला. आपला divorce झालाय हे आपल्याच प्रचंड जवळच्या मित्राला कळू न देता ती नायिका एक वर्ष बेघर असूनही आयुष्याशी लढते आहे. कारण काय? तर त्याला हे कळल्यास वाईट वाटेल. त्याच्या घरी एक काम करणारी appoint केल्याचं सांगून तीच कामवालीच्या हाजगी त्याच्या घरची सगळी कामं करते आहे. कारण तिला त्या पैशांची गरज आहे. आणि तिची ही अवस्था कळल्यास तिला सगळं मिळवून द्यायची capacity असलेला तो तिचा स्वाभिमान जपण्यासाठी तिला काहीही मदत करत नाही. त्यांचं नातं मला आवडलं. एकमेकांबद्दलची काळजी पण तितकंच space देणं. आदर करणं. त्याची एखादी गोष्ट आपल्याला सांगायची राहून गेली आणि बाहेरुन कळली तर लगेच भांडण न काढता, सांगायची राहिली म्हणजे काहीतरी कारण असेल असं मानणं… जसं घरी तसंच वातावरण ऑफिस मध्येही. कामाच्या ठिकाणी कितीही स्पर्धा असली तर दुसऱ्याच्या कामाचा आदर करणं. दुसऱ्याच्या प्रगतीत आपल्या कंपनीची प्रगती असल्यानी निर्विवाद दाद देणं… हे सगळं वाचताना कदाचित फारसं अवघड किंवा वेगळं वाटत नसेल पण कोरियन सिरीज बघताना या सगळ्यामुळे आपण stress free राहतो. आपल्याकडे हलक्या फुलक्या गोष्टी नक्कीच असतात पण नात्यांचा गुंता असेल तर ती गोष्ट फारशी हलकी नसते. गोष्ट हसवणारी असेल तर विनोदीच असते. निरागसपणा असेल तर एकतर लहान मुलांचा असतो किंवा जर नायक/नायिकेचा असेल तर तो निरागसपणा गोष्टीच्या मध्यवर्ती असतो. आपल्या कलाकृती वाईट आणि त्यांच्या चांगल्या असा माझ्या म्हणण्याचा कल नाहीये. आपल्याकडे गोष्टी तशा अंगानी जाण्याची ही कारणं आहेत. आपला देश तितका श्रीमंत नाहीये. आपल्या आयुष्यातले problems त्यांच्या इतके उथळ नाहीयेत. मुलभूत गरजा इतक्या सहज उपलब्ध नाहीयेत वगैरे आहेच. मुद्दा तो सगळा नाहीये आत्ता. मुद्दा हा आहे की खिळवून ठेवणारी पण त्रास न देणारी गोष्ट बघायला मनाला हलकं वाटतं.

ही गोष्ट मुख्यत्वे एका प्रकाशनाच्या ऑफिसभोवती फिरते. पुस्तक तयार करणं हे सगळ्याच प्रमुख पात्रांचं काम आहे. लेखकांना भेटणं, त्यांचा लिखाणाचा प्रवास, त्यांची हस्तलिखितं, त्यांचा निर्मळ वास… या सगळ्यामागचा उत्साह. एकेक पुस्तक खपल्यावर होणारा आनंद… सगळ्यांचीच एका पुस्तकामागे असलेली अमाप मेहनत… हे सगळं लक्षात राहण्यासारखं आहे. त्यांच्या ऑफिस कल्चरची अशी काही झलक त्यांनी दाखवली आहे की शेवटी मला भुरळच पडली… असं वाटलं की आपणंही अशीच नोकरी बघावी. पुस्तकाचा संपादक म्हणून काम बघावं. नाही मिळालं जे मिळेल ते काम घ्यावं पण पुस्तकाच्या सानिध्यात असलेलं. किंवा कुठेतरी महिना महिना गायब होऊन पुस्तकं लिहावीत.  त्यांच्या सारखं रविवारी घर clean करावं, रामेन खात सोजू नाहीतर वाईन प्यावी. थंडी असो नसो, कोट घालावेत आणि आपल्याकडेही एक गोड कुत्रा असावा. भाषा येत नसताना, कल्चरची माहिती नसताना त्या वातावरणात मला विलीन व्हावंसं वाटलं. प्रत्येक कोरियन सिरीज बघताना आजवर वाटलंय तसं. मजा आली.

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: