दिवसागणिक चोऱ्या होतायेत,
संपत्ती लुटली जातीये… काळाबाजार होतोय कलेचा,
साहित्याची माती होतीये… शोषण कष्टकऱ्यांचं…
प्रत्यक्ष बघतोय मी पण उपयोग शून्य,
कारण पुरावे नाहीत पुरेसे… बघे नाहीत फारसे,
कामं असतील हो त्यांना… मीच तेवढा रिकामटेकडा…
समुद्रातून येतात काय हो? की आले परग्रहाहून?
ते सारे असते ठीक पण जन्म होतोय इथेच…
पोसले जातायेत, सोसले जातायेत आपल्याच मानसिकतेतून…
जन्म घेतायेत, जन्म देतायेत आपल्याच मानसिकतेतून…
खिसेकापण्याआधी त्यांनी चोरली असेल का हो हाव?
वित्त सारे संपले तरी संपतोय कुठे डाव?
ज्याचे जाते त्याचे जाते, जळते त्याला कळते…
पण इतरांनाही कळले तर हरकत काय?
लुबाडून, लुटुन, ओरबाडून, हिसकावून, हिरावून
चोर श्रीमंत होतोय का?