अति झाली भावना की बोथट होते म्हणे,
म्हणे आमच्याकडे पाण्याला तुडवडा नाही..
आम्ही करतच नाही किंमत भावनांची,
कारण आमच्याकडे भावना खूप झाल्यात..
त्यामुळे थेंब काय ओघळ काय
झरे वाहतात दिवसा ढवळ्या..
प्रेमापोटी?
खूप झालीयेत प्रेमं, प्रेमातून वाद,
वादातून विकोप आणि त्यातून मारहाण..
पण छे आम्ही लक्षच देत नाही
कारण आमच्याकडे हे ही खूप झालंय..
बसतात बुक्के-लाथा जळतात देह
आतून किंवा बाहेरुन रात्रीच्या काळोखात
प्रेमापोटी?
त्यानं तिला विचारणं झालंय खूप
तिनं नाकारणं झालाय खूप
कित्येकदा होकारणं झालंय खूप
अन् अनेकदा मुंडकीही उडवडलीयेत..
त्याचं तिच्यासाठी तिचं त्याच्यासाठी
तिचं तिचं तिचं भर रस्त्यात आम्लानी
प्रेमापोटी?
पण छे आम्ही लक्षाच देत नाही
कारण आम्ही नाही त्यांचे आईबाप
आमचं पोरगं हे करणंही शक्य नाही
केलं तर ते पोरगं आमचं नाही
ढकलतो आम्ही जबाबदारी दुसऱ्यावर
दाखवून बोट तीन ठेवत आपल्याचकडे
प्रेमापोटी?
खूप झालंय मुलालाही नाकारणं
खूप झालं त्याचं भविष्य
त्याच्याआधीच आपणं आकारणं
खूप झालंय त्यानीही
लादलेले निर्णय स्वीकारणं..
मग करायचं एक मागून दोन
मागून तीन काहीही न मागता
प्रेमापोटी?
हो प्रेमापोटी
प्रेमाच्या पोटी म्हणे असते ताकद
घेतं सामावून वाटेल ते
म्हणूनच आम्ही देतो लादतो फेकतो
वाट्टेल ते
छे नाहीतर असं का केलं असतं?
छे नाहीतर वागलो नसतो का धड?
छे नाहीतर काळजी ही घेतली असती..
छे काहीतरीच बुव्वा! सगळं आम्हीच झेललं असतं!
प्रेमापोटी!!!