मला सतत खोटं बोलावसं वाटतं
कोणाला खरं समजत नाही म्हणून
नाही कळत लोकांना मला घरी यायला आवडत नाही
रात्रीच्या वेळी रस्ते मला सोडवत नाहीत
पाऊस पडून गेल्यावर त्यात चमकणारे पिवळे दिवे साद घालत राहतात
पाय चालत राहिले की मनातून काही रस वाहत राहतात
मला सतत खोटं बोलायची सवयच लागली आहे
कोणाला खरं पचत नाही म्हणून
मला टिंगल करावीशी वाटते कोणा मावशीची
उलट उत्तर द्यावं वाटतं कोणा काकांना
समारंभात दोन पाय फाकवून समोरच्या खुर्चीत ते टाकून
वारा घ्यावासा वाटतो जेव्हा जरीच्या साडीत कचकचतं
मला सतत खोटं बोलावच लागतं
मी ओके नाहीये हे ऐकायची ताकद नाहीये तुमच्यात म्हणून
मी ओके का नाहीये याचं कारण ऐकायची कुवत नाहीये तुमच्यात म्हणून
मला निघून जायचंय ही माणसं सोडून हे तुम्ही पचवू शकणार नाही म्हणून
मला माझं शरीर वापरुन बघायचंय हे तुम्हाला झेपणार नाही म्हणून
म्हणून मला मन वापरावं लागतं
ते खरं खोटं विचार करत बसायला
मला मागे वळावं लागतं कोणी हसलं तर त्याला कारणं द्यायला
एका संध्याकाळी बस मध्ये बसून निघून जाता येत नाही
म्हणून बोलावं लागतं खोटं
एका सकाळी मेल्यासारखं पडून राहता येत नाही
म्हणून बोलावं लागतं खोटं
काल जी नाती होती ती आजही टिकवावी लागतात
म्हणून बोलावं लागतं खोटं
काल मी जशी होते आज तसंच वागावं लागतं
म्हणून बोलावं लागतं खोटं
तुमच्यात जगायला बोलावं लागतं खोटं
तुम्ही म्हणता कसली खोटारडी आहे ही
असेन, आहे, झाले आहे किंवा होतेच
पण स्वतःशी प्रामाणिक राहायला
तुमच्याीशी बोलावच लागतं खोटं
Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.
खरंच खूप छान विचार आहे , सगळ्या लोकांचे असेच आहे पण तू * मी* म्हणून सांगितले आहेस हे खूप भारी वाटले आहे मला . Keep it up 👍
LikeLike
😊😊
LikeLike