कस्तुरी स्वतःहून उठून order द्यायला गेली. तशी तिकडे self service वगैरे नव्हती पण कस्तुरीलाच तिकडे थांबणं जरा awkward झालं होतं. ती गेल्यावर मात्र पुष्कर मानसीकडे एकटक बघायला लागला. जसं की तो तिला विचारत होता… “तुला मला काही सांगायचंय का?”

पण मानसी त्याचे डोळे वाचून सुद्धा गप्प होती. शेवटी पुष्करनीच पुढाकार घेतला.

“तुला मला काही सांगायचंय का?”

“नाही. का रे?”

“मी तुमचं बोलणं ऐकलं.”

“Bad manners”

“चुकून ऐकलं”

“तरी पण bad manners”

“तुम्ही बोलत होता त्यापेक्षा काहीच वाईट असू शकत नाही.”

“कस्तुरी येतीये.”

“येऊ दे. I don’t care. I thought तू जे काही वागतीयेस ते खरं वागतीयेस माझ्याशी. मला काल भेटलेली मुलगी विश्वास टाकतीये वाटलं मला म्हणून मी तुझं चिडणं वगैरे सहन करुन इथपर्यंत आलो. हे.. हे जे काय तुम्ही बोललात ते ऐकायला आलो नाहीये मी…”

“Order दिली. मला कॉफी पण सांगितली आहे. तुम्हाला काही सांगू?” कस्तुरीनं विचारलं खरं पण विचारता विचारता ती खुर्चीत बसली.

“मला कॉफी सांग.” पुष्कर तिला हाकलायच्या तयारीत म्हणाला.

“दादा!” कस्तुरीनं खुर्चीत settle होत हाक मारली.

“जाऊन सांग…” पुष्करच्या आवाजात almost राग आला होता.

“पुष्कर इकडे self service नाहीये.” मानसीनं पुष्करला जरा control करायचा प्रयत्न केला.

“नाहीये मग आधी कशाला गेली ती स्वतःहून सांगायला… आधी गेली मग आता परत जाईल.” तो जवळ जवळ मानसीवर खेकसला.

त्या आवाजानं कस्तुरी घाबरली आणि पटकन order द्यायला गेली.

“वाटतो तितका शामळू नाहीयेस तू.”

“नाहीये. पण तुम्हा मुलींना कळत sensitive मुलगा चम्या वाटतो आणि dashing मुलगा oversmart वाटतो.”

“असं काही नाहीये.”

“फक्त films चा exception आहे. तिथली sensitive मुलं chocolate hero आणि oversmart मुलं handsome असतात तुमच्यामते.”

“काहीही…”

“का खोटं बोलतीयेस? तुला problem असेल माझ्याशी तर मी निघून जाईन. तोंडावर सांग. bike चालवतेस, dashing समजतेस स्वतःला तर मग तेवढं बोलायचे guts दाखव.”

“पुष्कर कस्तुरीला तू आवडतोयस आणि मी तुझ्याशी बोलले की तिला त्रास होतोय.”

“पण मी तिच्याशी बोललोच नाहीये तिला मी आवडायला.”

“तिला मुलं अशीच आवडतात. First sight. तिला बोलावं नाही लागत.”

“म्हणून तिची break ups पण अशी होत असतील.”

“I know.”

“मग तोंडावर बोल तिच्या.”

“नाही बोलू शकत.”

“का?”

“कारण hurt होईल ती.”

“तिचं नुकसान झालेलं चालतंय तुला पण ती hurt झालेली चालत नाहीये. मला तुमची chemistry कळतंच नाही राव. सगळ्याच मुली अशा complex असतात का?”

“मला बाकीच्यांचं माहीत नाही पण आम्ही अशाच आहोत. खूप वर्ष गेले अशाच आहोत.”

“मानसी I don’t like her. At all.”

“पण का? Try तर मारुन बघ.”

“तू वेडी आहेस का? आमच्यात असं काही बोलणंच झालं नाहीये की मी impress व्हावं आणि आता मी तुमचं मगाचंच बोलणं ऐकल्यावर तर प्रश्नच येत नाही.”

“Ok fine. आत्ता खाली तरी जाशील का तिच्याबरोबर?”

“कुठे खाली?”

“एकडे एक रस्ता आहे खाली जायला. म्हणजे डोंगर उतरावा तसं आहे मग जरा चढ आहे आणि मग finally तो रस्ता पाण्यापाशी जातो. जास्त लांब नाहीये.”

“Sounds interesting.”

“Great मग ती आली मी सांगते तिला.”

“Obviously मी तिच्याबरोबर जात नाहीये.”

“का?”

“कारण मला कचरा करायचा नाहीये इतक्या चांगल्या opportunity चा.”

“जा की मी म्हणतीये म्हणून तिच्याबरोबर.”

“मी म्हणतोय म्हणून तिला reality check देणारेस तू?”

मानसी गप्प झाली पण इतक्यात कस्तुरी दोघांसमोर येऊन उभी राहिली होती.

“कस्तुरी बस. मला बोलायचंय.”

पुष्कर आपल्याला बस म्हणतोय या कल्पनेनीच कस्तुरी अशक्य खूश झाली.

“बोल नं. मी ऐकतीये.”

“मी मगाशी चुकून तुमचं बोलणं ऐकलं. मला absolutely idea नव्हती की तुम्ही काहीतरी secret वगैरे बोलत असाल. पण anyways मी असं ऐकलं की you like me.”

कस्तुरी गप्प आणि गार होती.

“do you?”

तरीही काहीच उत्तर आलं नाही.

“Ok fine. Let’s assume you do. तर मग असंय की we haven’t really interacted with each other आणि तुला मी आवडायला तसं काही reason च नाहीये. So please stay away. मला असं ओळख पाळख नसताना मागे लागणाऱ्या मुली नाही आवडत. I mean मला ते प्रेम बिम असले लफडे नकोच एत. मला मैत्री चालेल आणि ती मी मानसीशी करायचा प्रयत्न करतोय. I hope I am clear.”

कस्तुरी आणि मानसी दोघीही त्याच्याकडे बघतंच राहिल्या. खरंतर पुष्करलाही आपण आत्ता जे बोललोय ते आपणंच बोललोय यावर विश्वास नव्हता. पण रागात असं काहीतरी धमाकेदार करायची त्याची सवय होती. एरवी तो मात्र मांजरच असायचा तो.

कस्तुरी रडत washroom मध्ये निघून गेली. मानसी तशीच confused उभी होती.

“किती घाणेरडं toilet आहे. रडण्यासारखं तरी आहे का? At least आमचं तरी घाणेरडं आहे.”

“आमचं पण खराबच आहे. पण emotion समजून घे नं तू…”

“तू काय तिला समजवायला जाणार नाहीयेस का?”

“जायला पाहिजे नं?”

“I don’t know. तुझी मैत्रीण आहे.”

“Ideally जायला पाहिजे पण मला डुक्करगिरी करावीशी वाटतीये.”

“मग कर.”

“हो कारण तिला किती दिवसांपासून हा eye opener द्यायचा होता मला.”

“मग का नाही दिलास?”

“माहीत नाही. तिला वाईट वाटलं असतं.”

“This is beyond my capability. मी खाली जातोय. तुमचं झालं patch up की ये.”

“ok.”

पुष्कर मानसीनं सांगितलेल्या रस्त्यावरुन चालत होता. आधी उतार मग चढ. तो एक छोटासा डोंगर उतरुन त्यानं break घेतला. Complete शुकशुकाट. पक्ष्यांचेच काय तर त्याच्या बूटांचा, पानांच्या सळसळीचा, श्वासाचा, पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज सुद्धा स्पष्ट दिसत होता. किती बरं वाटत होतं. खरंतर जमिनीवर आडवं पडून त्या झाडांच्या जंजाळातून वर आकाशाकडे बघत तयार झालेल्या जाळीतून तोंडावर येणारा प्रकाश घ्यायचा खूप मोह झाला. पण काटेकुटे तर टोचले असतेच वर काही वारुळं दिसली त्याला. सळसळत पानांमधून फिरणारा एक सरपटणारा प्राणी सुद्धा जाणवला. त्यामुळे तो थांबला नाही. सरळ चालत राहिला आणि अचानक समोर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणीच आलं. शांत, हलक्या कुरवाळणाऱ्या लाटा असलेलं आणि काही मोजकी पाखरं पण एकही माणूस नसलेलं. रोज सकाळी उठून डबा घेऊन कॉलेज ऐवजी मित्रांकडे जायचा आणि दिवसभर laptop समोर game खेळत पडायचा पुष्करला कधीच कंटाळा आला नव्हता. पण तेच ते मित्र आणि ठरलेलं आयुष्य जगत राहिल्यामुळे आजूबाजूला अजून काय आहे आणि काय असू शकतं हे आपण explore च केलं नाहीये अशी जाणिव मात्र झाली. मुलांच्या मानानं तो जरा जास्त हळवा होता पण मुलानं हळवं असणं म्हणजे गैर असंच त्याच्यावर बिंबवण्यात आलं होतं. म्हणूनच कदाचित तो जरा कमी बोलायचा आणि चार लोकांत फारसा express व्हायचा नाही. त्याच्या आवडीनिवडी त्याच्या मित्रांपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या. त्याला शांत बसायला आवडायचं. असंच. पुष्करनी Maroon 5 चं memories गुणगुणायला सुरुवात केली. काही वेळात त्याच्या मागून पावलांचा आणि पायाखाली पालापाचोळा चुरला जाण्याच्या आवाज आला. त्यानं गाणं थांबवलं नाही. तिनंही त्याला थांबवलं नाही. गाणं संपेपर्यंत ती ऐकत राहिली.

“छान गातोस.”

“Thanks मानसी.”

“कस्तुरी त्यांना join झाली.”

“रडायची थांबली का पण?”

“असेल. मला तर ढकलून दिलं तिनं. आत पण येऊ दिलं नाही.”

“आता?”

“आता माहीत नाही. अशी भांडणं खूप होतात आमची. बोलेल २-३ दिवसांत.”

“मग तिच्यामागे गेली का नाहीस. मी आलो असतो एकटा परत. Uber Ola काहीतरी केलं असतं.”

“का? मी आलीये तुला company द्यायला ते आवडलं नाहीये तुला?”

पुष्कर निरुत्तर होता. मानसीनं त्याचा हात धरुन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. पुष्कर मात्र अवघडूनच बसला होता. एका मोठ्या दगडावर सगळ्या गर्दीपासून लांब, इतक्या सुंदर पाण्यासमोर ते दोघंच होते. मानसी त्याच्या बऱ्यापैकी जवळ सरकली होती.

“मानसी, मला तुला काहीतरी सांगायचंय…”

“बोल नं….”

पुढे काही सेकंद तशीच शांतता होती.

“काय सांगायचंय?”

“काही नाही. राहू देत.”

“अरे? मगाशी तर कसला धाडधाड बोललास. कुठे गेले ते guts?”

“मानसी, मला girlfriend आहे….”

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: