आनंदीनं वरच्या cabinet मध्ये तिची बॅग कोंबली आणि आपल्या सीटवर बसली. बोर्डिंग बंद व्हायची वेळ आली तेव्हा कशीबशी ती धावत पोचली होती. त्यामुळे सगळे लोक आधीच बसले होते. आनंदीनं बसल्यावर जरा श्वास घेतला. हुश्श करुन घाम पुसला. जरा मोकळेपणानं बसावं म्हटलं तर तिचं लक्ष शेजारच्या माणसाकडे गेलं. तो तिच्याकडे स्मितहास्य करुन बघत होता. आनंदी एकदम दचकली. त्याची french beard, चष्मा आणि तो formal मधला look बघून ती अगदीच हादरली. “अरे हा… हा तर शौनक आहे.” तिला काय करावं कळेना. तिनं शौनककडे बघून एक smile दिली आणि समोर बघायला सुरुवात केली. तो तिच्या कानात कुजबुजला. “तू आत आलीस तेव्हापासून बघतोय तुझ्याकडे. तुझं आत्ता लक्ष गेलं?” आनंदीला या वाक्यानं जितका आनंद झाला तितकंच कसंतरी सुद्धा झालं. ती कशीबशी लोकांना धक्के देत, धडपडत तिच्या सीटपर्यंत आली होती. वर्गात जसं उशीरा आलं की सगळे त्या विद्यार्थ्यामुळे कसा आपल्या ज्ञानार्जनात अडथळा येतोय असं त्याच्याकडे बघतात, तसं आनंदीला वाटलं. त्यामुळे तिनं खाली मान घालून कोणाकडेच बघायची गरज नाही असा ठराव पास केला आणि ती तिच्या सीटपाशी पोहचली. या शौनकला बघितल्यावर आनंदीला त्याच्याबरोबरचा शेवटचा दिवस आठवला. नुकतंच कॉलेज संपलं होतं. दोघांना नोकऱ्या लागल्या होत्या. त्याच्या मित्रांची पार्टी होती आणि हट्टानं त्यात आनंदी शिरली होती. सगळे pub च्या आत जात होते. तिकडे क्लासमधली मिहिका सुद्धा होती. तिनं शौनकला लाडिकपणे request केली की तिचा partner म्हणून तो आत entry घेईल का? आनंदीच्या चेहऱ्यावर मिहिकासाठी प्रचंड दया असताना शौनकनं कधी आनंदीचा हात सोडून मिहिकाचा धरला तिला कळलंही नाही.” “आन्दु hope you understand! Single मुलींचा problem होतो. कोणत्या चम्या बरोबर आत आल्या की मग मुलं मागे लागतात. तू रोहनबरोबर entry घे.” “मग? मिहिका आणि रोहन का enter नाही झाले? मला boyfriend असताना मी single मुलींची समस्या का face करु??” आनंदीच्या मनात अनेक प्रश्न आले. पण तिनं कोणालाच ते विचारले नाहीत. ती थेट घरी गेली. रात्रभरात शौनकचा ती कुठे गेली हे विचारायला एकही फोन आला नाही.” “आन्दु! ए तंद्री मास्टर! तुझ्याशी बोलतोय मी!” आनंदी भानावर आली. “आन्दु!! Yukk.. कसं वाटतं ते ऐकायला???” आनंदी हसून तिच्या नाराजीला उगाचंच टोलवत म्हणाली. “कसं वाटतं? कॉलेजमध्ये असताना तूच मागे लागली होतीस… मला काहीतरी pet name ठेव… असं काहीतरी म्हण जे इतर कोणीच म्हणत नाही…” आनंदीनं ते दिवस खूप खूप मागे टाकले होते. Pet name ठेव म्हणून ती खरंच शौनकच्या मागे लागली होती. पण Pet name ठेव यातून शौनकनं तिच्या मनातलं प्रेम ओळखावं यासाठी ते मागे लागणं होतं. तिला खरंच मनापासून आवडायचा शौनक. तिनं काय नाही केलं त्याच्यासाठी. त्याला मिळवण्यासाठी. पण आता जाऊ दे. त्या आठवणी परत काढायच्या म्हणजे शौनकच्या परत एकदा प्रेमात पडण्याची शक्यता. असो… दोन वर्ष त्या प्रेमभंगातून बाहेर येण्यात गेली आणि आता कुठे दोन वर्ष नोकरी करुन मग सगळ्या परीक्षा देऊन ती अमेरिकेला निघाली होती. शौनक अमेरिकेत असतो हे तिला चांगलं ठाऊक होतं. त्यामुळे तो आपल्याला भेटला तर? तर काय बोलायचं? कसं वागायचं? हे सगळे प्रश्न तर होतेच. पण “अमेरिका म्हणजे काही पुणं नाही. अर्ध्या जगानं रुपाली-वैशालीत पडीक असायला!” असं बोलून मैत्रिणीनं बाह्य सांत्वन आणि आंतरिक खच्चीकरण केलंच होतं. अमेरिका पुणं नसलं तरी आम्ही पुण्याची माणसं तरी तीच आहोत. “बघ कसा भेटला जातानाच!” आनंदीनं मनातल्या मनात मैत्रिणीला तर सांगितलं होतं पण प्रत्यक्षात सांगायची हिंमत नव्हती. आनंदीनं शौनकशी कमीत कमी बोलायचं ठरवलं. “yes.. म्हणजे काय होईल की मला त्याच्याबद्दल ओढ निर्माण होण्याआधी त्यालाच होईल आणि मी मागे लागण्याचा प्रश्नच येणार नाही. पण मी आता का मागे लागेन?? Facebook वर याला block केल्यापासून याचं लग्न झालंय का ते सुद्धा माहीत नाहीये मला.” आनंदीनं headphones घातले आणि ती movies surf करायला लागली. “hmmmmm…. यार… या मुलाचा perfume म्हणजे वेड लावतो”….”एक वेळ शर्ट दोन कमी घेईन पण perfume घेताना चिंगुसी नाही.” कॉलेजमध्ये शौनकचं ठरलेलं वाक्य. “त्याला बरोबर कळलं होतं. मुलींना खिशात कसं घालायचं.” एक movie सापडला… All time favourite! कुछ कुछ होता है! पण आत्ता तो suitable नव्हता. “उगाच त्यानं एक नजर screen वर ठेवली तर त्याला वाटेल की मी अजून त्याच्यासाठी थांबले आहे.” आनंदीनं सगळी list बघितली. आत्ता लक्ष लागणारंच नव्हतं त्यामुळे नवीन सिनेमा बघायचा नव्हता. आणि एकदा बघितलेले सगळेच romantic होते आणि एकदा बघून झाल्यावर ते अनेकदा बघितलेले होते. त्यामुळे आनंदीनं DON लावला. नवीन DON. तिचं सगळं लक्ष शौनकच्या हालचालींकडेच होतं. पण किमान त्याच्याकडे एकटक बघत बसण्यापेक्षा हा option बरा होता. शौनकनं अंगावर पांघरुण ओढून घेतलं. डोळे मिटून तो शांत पडून राहिला. शौनक असा बाजूला झोपला की त्याच्या कानातच काडी घाल, किंवा नाकात काहीतरी गुदगुल्या कर अशी आनंदीला सवय होती. पण आता तिचा शौनकवर पुरेसा ह्क्क नव्हता. पुरेसा नाही, हक्कच नव्हता. आपल्याकडे दुर्लक्ष करुन तो झोपलाय हे बघून तिला चैन पडेना. ती उगाचच हालचाल करु लागली. शौनकला त्या धक्क्यांनी जाग आली. तशी त्याला कितपत खरी झोप लागली होती देवच जाणे पण तो उठला. त्यानं एकदम आनंदीच्या कानातून headphones काढले… “बोलावंसं वाटतंय तर बोल ना!” “मला? छे! मी सिनेमा बघतीये. हं पण तुला बोलायचं असेल तर बोलू शकतो आपण. सिनेमा बघितलाच पाहिजे असा नियम नाहीये. मी नंतरही बघू शकते. In fact हा तर मी बघून झालेला आहे. बोल.” ती ही लांबड लावत असताना शौनक तिच्याकडे एकटक बघत होता. त्या एकटक बघण्यानी आनंदी कावरीबावरी झाली. “मी काय तुला आज ओळखतोय का आन्दु?? आहेस तश्शीच आहेस तू..” “नाहीये रे मी आहे तश्शी! परत एकदा मला धरुन अचानक सोडून दिलंस तर या वेळेला रडत न बसता तुला चांगलं सुनावून किमान तुझं नाक फोडेन इतपत टणक झालीये मी…” आनंदीनं बोलून टाकलं. उघड उघड! शौनक अवाक झाला. “नाही करणार परत तसं. Chill!” आता मात्र आनंदी अस्वस्थ झाली. नाही करणार परत तसं म्हणजे?? म्हणजे आपल्यात काहीतरी होण्याचे chances आहेत? तुला मी अजून आवडते. या वेळेला तू मला सोडून जाणार नाहीस??? इतके प्रश्न होते मनात… पण तिनं विचारलं वेगळंच. “कुठे राहतोस US मध्ये?” “San Franscisco” “Ok…” “तू कुठे राहणार आहेस?” “मी लवकर चाललीये. आधी San Jose ला मावशीकडे जाणार आहे मग बघू. अजून accomodation बघितलं नाहीये मी.” “मग माझ्याकडे रहा.. तसंही मी बाहेरच्या खोलीत बघतोच आहे कुणीतरी.” “विचार करुन सांगते.” झेप घेतल्यासारखं उठून कुशीत बसायचं होतं आनंदीला त्याच्या. पण ते शक्य होणार नव्हतं. तिला खात्री पटली. “याला अजून आपण आवडतो पण आता सांगायला जरा awkward होत असेल. पण मी single आहे हे विचारतंच नाहीये तो! म्हणजे मी single असूच शकत नाही असं तर वाटत नाहीये नं त्याला??” आनंदीला भाव हवा होता. पण आता तो कसा मिळवायचा ते ही कळत नव्हतं. आता तिनं पांघरुण ओढून घेतलं. “मला खरंतर तुझ्याशी बोलायचंय पण खूप दमलीये मी. १०-१५ मिनिट डुलकी काढते मग बोलुया.” “बरं…” आनंदीनं डोळे मिटून घेतले. शौनकच्या हाताचा तिला हलका स्पर्श होत होता. तिनं तिचा हात बाजूला घेतला. ही तिनं घेतलेली परीक्षा होती खरंतर… आनंदीला अशा परीक्षा घ्यायची फार सवय होती. Insecurity असली की माणसं परीक्षा घेतात. आनंदीला शौनकच्या बाबतीत कायमच insecurity होती. हलका मागे घेतलेला आनंदीचा हात शौनकच्या हाताची वाट बघत होता. शौनकचा हात आला. त्याचा परत एकदा आनंदीच्या हाताला स्पर्श झाला. मग हळूच बोटांवरुन हात फिरला अणि चक्क आनंदीच्या नकळत आनंदीनं तो हात धरला. आता तो हात आनंदीच्या पांघरुणात शिरुन स्तब्ध होता. पुढे तिला झोप लागली. अनेक वर्षांनी इतकी गाढ झोप. “माझा हात म्हणजे काय magic आहे?? किती शांत झोपतेस तू माझा हात धरुन…” शौनक तिच्या कानात पुटपुटला पण आनंदीला खरंच झोप लागली होती. शौनक अख्खा वेळ तिच्याकडेच एकटक बघत होता. असं तो बघत बसला की तिची झोपमोड व्हायची नाही. कोणीतरी आपल्याकडे लक्ष देतंय. आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाही असं काहीसं. मग मात्र flight land व्हायची वेळ आली आणि शौनकनं तिचा seat belt लावला. त्यानं आनंदीला जाग आली. ती दचकून उठली कारण aircraft land होत होतं आणि त्यासाठी प्रचंड तिरकं झालं होतं. या प्रवासात तो कसा दिसतोय किंवा काय बोलला यापेक्षा सगळ्यात महत्वाचंी होती ती झोप. नवीन आयुष्य सुरुवात करण्याआधी नवीन start. आनंदीनं हसून त्याच्या हातात हात द्यायचा प्रयत्न केला. त्याला दंडाला धरुन जवळ ओढून तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवत. पण तो reluctant होता. झोपे आधीचा शौनक आणि हा पूर्णपणे वेगळे होते. आनंदीनं शंकेनं त्याच्याकडे बघितलं. पहिल्यांदा परीक्षा न घेता ती स्पर्श केला होता. शौनक हसला. “कोमल, मी वरची बॅग काढतो, तू प्लीज माझा passport handy ठेव.” आनंदीनं Window seat वर बसलेल्या त्या कोमलकडे बघितलं. इतका वेळ face mask लावून बसलेली ती मुलगी शौनकची कोणीतरी होती. कोण ते माहीत नाही. “अरे ओळख तरी करुन दे!” असं म्हणून त्याला बोलायला भाग पाडावं हे ही आनंदीला सुचलं नाही. तिनं जागा दिली. तिच्या हातात दोघांचे आपापल्या नावांची covers केलेले passports होते. एकसारखे. गळ्यात मंगळसूत्र नव्हतं पण हातात ring होती. शौनकला तर सगळ्याच metal ची allergy आहे हे काही आनंदीला नवीन नव्हतंच नाही का? शौनक आणि कोमल निघून गेले. त्या दिवशी pub च्या बाहेरची गर्दी जशी मिनिटभरात रिकामी झाली तसंच हे विमान पण रिकामं झालं होतं. ते bodyguards जसे आनंदीकडे बघत होते तशा या airhostess होत्या. नाकावर पंच मारुन जाब विचारण्याइतकी आनंदी धीट झालीच नव्हती. तिनं वरच्या cabinet मधून तिची बॅग काढली. लोकं तिला धक्का देत होते. ती त्यांच्या धक्क्यांनी पुढे पुढे सरकत होती. बाहेर तापमान pleasant होतं. पावसाचे chance नव्हते. सगळं काही अलबेल होतं आणि आतली परिस्थिती मात्र आतच ठेवण्यासारखी होती!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

2 Comment on “आनंदी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: