पुष्कर पटकन उठला.

“तू इथं काय करतीयेस?”

“I think तुला माहितीये मी इथे काय करत असेन!”

“तू इथं काय करतोयस?”

“झोपलो होतो. Relax करत होतो.”

“इथे?”

“हो…”

“मी एवढी पण बावळट नाहीये पुष्कर की तू मला काहीही सांगावंस आणि मी विश्वास ठेवावा.”

पुढे काही क्षण शांतता होती.

“कस्तुरी. तू जा. मी बसलोय निवांत. मला बसू दे. मानसी येईल थोड्या वेळात आणि मग आम्ही एकत्र घरी जाऊ.”

“मी मानसीला गेले १५ वर्ष ओळखते पुष्कर. ती नाही येणार. आणि आली तर तुझ्या नाकासमोरुन निघून जाईल पण तुला lift देणार नाही.”

“ठीके. No issue… तू जा पुढे.”

“का सोडून गेलीये अशी? चिडूनच गेलीये ना?”

“hmmm…”

“मग चल माझ्याबरोबर.”

“मला नाही यायचं!”

“Fine मग पुण्याच्या दिशेला चालायला सुरुवात कर. संध्याकाळी पोचशील.”

पुष्करला खरंतर कस्तुरीच्या मागे बसून जावंसं वाटत होतं. त्यालाही मजा करायची होती. त्यालाही आता मुळशीला जायचं होतं. पण कस्तुरीबरोबर मानसीनं बघितलं असतं तर फारच पंचाईत झाली असती.

“पुष्कर! माझं ऐक. चल माझ्याबरोबर. तुम्ही गेल्यावर आकाश आला आणि तो जे काही वागला ना… आईशप्पथ डोक्यात गेला माझ्या. मग मी पण सटकले. ते पण इथे पोचतीलंच आता. ते यायच्या आत आपण निघुया.”

“तु्म्ही सगळे असे विचित्र का आहात?”

“विचित्र?”

“हो. एकमेकांबरोबर जायचंच नव्हतं तर पायात पाय घातलेच कशाला?”

“मला नाही म्हणता येत नाही आणि मानसीला मला सोडून जाता येत नाही म्हणून.”

“आत्ता गेलीये की सोडून!”

“असेल… पण सोडून त्याच ठिकाणी गेलीये जिथे मी येणार हे तिला माहितीये. बेट! संध्याकाळी येताना आम्ही एकत्र येणार.”

“मला नाही यायचंय तुझ्याबरोबर.”

“Manny नी बघितलं की तुला मानसीनं असं सोडून दिलंय तर तो तिला काहीतरी ऐकवेल. ते व्हायला हवंय का तुला? आणि तुला मानसीबरोबर दिवस spend नाहीये का करायचा? आणि what about me? माझ्याबरोबर?”

पुष्कर विचार करत राहिला. पण तो काही बोलणार इतक्यात कस्तुरीनं त्याचा हात धरुन त्याला गाडीपाशी नेलं. पुष्कर तिच्या मागे बसला. मानसीबरोबर day spend करणं वगैरे secondary होतं. त्याला मानसी okay आहे नं ते बघायचं होतं. मानसीला गाड्यांची, trucks ची, speed ची आणि height ची भीती वाटते हे त्याला कळलं होतं.

“तुला speed ची भीती वाटते?”

“नाही…” कस्तुरी हसत म्हणाली. तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

“आणि height ची?”

“नाही…” ती हसतंच म्हणाली.

“मग speed घे नं!!!”

“मला आवडत नाही actually पण तू म्हणतोयस तर yes… घेणार.”

कस्तुरीनं accelerator पिळला. Speedometer १०० ला जाऊन टेकला. उतार होता. तिनं clutch वरचा हात आणि gear वरचा पाय alert केला. कोणत्याही क्षणी खालचा gear टाकून गाडी control करायची तिची तयारी होती. पण त्या आधी या speed मुळे पुष्करनं तिच्या खांद्यावर ठेवलेले हात हवे होते तिला. पण ते झालंच नाही. पुष्करनं कस्तुरीच्या खांद्यावर हात ठेवलेच नाहीत. मागे धरुन बसला. रिकामा patch संपला आणि कस्तुरीचा speedometer 60 ला आला. helmet वर बसणाऱ्या वाऱ्याचा मारा पुष्करची मान मागे नेत होता. तिला जागच्या जागी ठेवायला त्याला जोर लावावा लागत होता. पण चेहऱ्यावर लागणारं वारं त्याला हवंहवंसं वाटत होतं. कारमध्ये बसून फिरण्यापेक्षा bike चा experience फारच वेगळा होता. रस्त्याचे बारकावे कळत होते. वातावरणातले फरक जाणवत होते. AC चा गारवा हे सगळे अनुभव मारुन टाकत नव्हता. आता ऊन लागायला लागलं होतं. पुष्करचे डोळे बारीक होऊ लागले. त्याला मध्येच तहान लागली. Dehydrated वाटत होतं. पुष्कर दुर्लक्ष करत होता. खड्डे जाणवत होते. कस्तुरी मात्र steady होती. त्याला तिचं कौतुक वाटत होतं. मानसीचे विचार मात्र सारखे येत होते. ती okay असेल का? पुष्करची आई त्याला नेहमी म्हणायची की तू गरजेपेक्षा हळवा आहेस आणि तुला self respect जरा कमीच आहे. जी मुलगी रस्त्यात सोडून गेली तिचीच काळजी त्याला वाटत होती. पण हे ही वाटत होतं की कारण नसताना तिनं हक्कानी विश्वासही टाकला होता.

“आपण मानसी आहे तिथेच जाणार आहोत?”

“हो… दुसरीकडे जायचंय तुला?? मला चालेल!!!”

“नाही… तिथेच जाऊ.”

पुष्करनं का माहीत का confirm केलं परत. May be ती जागा येत नव्हती म्हणून असेल कदाचित.

कस्तुरीनं परत speed वाढवला. पुष्करनं हळूच google maps काढून किती किलोमीटर्स राहिलेत याचा अंदाज घेतला. ते almost पोचलेच होते. फक्त मुळशीत कुठलं हॉटेल याचा त्याला अंदाज नव्हता. एका चढावर गाडी असताना कस्तुरीनं right indicator दिला आणि Paradise असं नाव असलेल्या जागी कस्तुरीनं गाडी घातली. उतारावरुन ते खाली आले आणि एकदाची गाडी थांबली. Pin drop silence. गाडीचं इंजिन बंद झालं आणि तिथे खूपच शुकशुकाट होता. पानांची सळसळ आणि काही पिंजऱ्यातल्या बदकांचं ओरडणं. बाकी शांतताच. कस्तुरीनं helmet काढलं. केस नीट केले. gloves वगैरे काढून चालायला सुरुवात केली. पुष्करची नजर भिरभिरत होती. आजूबाजूला मानसीला शोधत होती. कस्तुरी restaurant पाशी आली. पुष्करही आला. एका टेबलवर बसून शांतपणे omelette खाणारी मानसी त्याला दिसली. पण मग तिची गाडी पार्किंगमध्ये नव्हती. तिला बघून त्याचा जीव भांड्यात पडला पण तितकाच गाडी न दिसल्यामुळे अस्वस्थ झाला. कस्तुरी मानसीच्या टेबलवर बसलीच नाही. त्यांचं cold war असावं पण पुष्करला त्यात अजिबात interest नव्हता. तो मानसीच्या टेबलवर जाऊन बसला. मुलीची समजूत काढण्याची त्याला अगदीच सवय नव्हती. सवय काय साधा अनुभवही नव्हता.

“मानसी…”

“I am sorry. मी उगाचंच चिडचिड करुन निघून आले. पण तू आईला फोन करुन सांगितलंस की एक कस्तुरी नावाची मुलगी आहे बरोबर?? आणि मला सरळ कस्तुरी म्हणून आईशी बोलायला लावलंस! That was humiliating!”

“sorry म्हणू नकोस. माझा पण तेवढाच fault आहे.”

“मग तू सुद्धा sorry म्हण.”

“त्यापेक्षा दोघं sorry म्हणायला नको.”

“का? मी already म्हटलंय. तू म्हण की आता? Sorry म्हणायला काय लाज वाटते?”

“नाही. Sorry… Actually माझी आई माझे मेसेजेस वाचते.”

“What? lock नाहीये का तुझ़्या फोनला?”

“आहे. पण ती विचारते.”

“मग तू सांगू नकोस.”

“मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तिनी काल रात्री मेसेज वाचला तुझा. त्यात तू म्हणालीस की वेळेवर नाही आलास तर मी आणि कस्तुरी निघून जाऊ. So मुलगी म्हटलं की कस्तुरी असं तिच्या डोक्यात fit झाला.”

“अच्छा मग ज्या मुलीशी तू chat केलंस तिचं नाव वाचून शंका नाही आली का आईला?”

“का?”

“सोड ना… काय फरक पडतो?”

“पडतो… सांग.”

“माझ्या आईला फारसं okay नाहीये मी मुलींबरोबर फिरणं म्हणून मी तुझं नाव मानस असं save  केलंय…”

मानसी थोडीशी दचकली. मग पुष्कर मजा करतोय असा तिचा समज झाला. पण पुष्करचा चेहरा बदललाच नाही. मग मात्र मानसी खूप दचकली आणि वेड्यासारखी खिदळत सुटली.

“पण मला असं काहीच जाणवलं नाही आईशी फोनवर बोलताना… फोनवर बोलताना ती म्हणाली की माझा आनंद गगनात सामावत नाहीये की पुष्कर आत्ता एका खऱ्या मुलीबरोबर आहे…”

“अं… Actually तसं ती pretend करते पण खरं तसं नाहीये.”

“Oh… मग हे तेव्हाच सांगायचंस ना…”

“As if तू chance दिलास… Anyways मी जरा washroom ला जाऊन येतो. मला fresh व्हायचंय. मी धुळीत मळलोय असं feeling येतंय मला.”

“हे बघ इकडे back side ला आहे… बेडूक असू शकतो सांभाळून…”

“What?”

“Just kidding रे!”

पुष्कर गेला न गेला तोच कस्तुरी मानसीच्या टेबलवर आली.

“काय मग? बरं झालं नं मी पुष्करला मागे सोडलं? तुला मागे बसवता आलं त्याला.”

“हो thanks… I knew तू मुद्दामूनच काहीतरी कारण काढून हे केलं असशील…”

“बाकीचे कुठे आहेत?”

“गेले खड्ड्यात… आकाश आला तू गेल्यावर… मला म्हणाला patch up करुया?”

“मग?”

“मग काय? मला नव्हतं करायचं patch up… हे लोकं सुट्टा मारायला गेले आणि मी सुटले.”

“आणि तो इकडे आला तर?”

“नाही येणार… anyways ही जागा आपली favourite आहे. त्याची नावडतीच आहे नं…”

“hmmm… order कर काय हवंय ते… मग खाली जाऊ पाण्यापाशी…”

“ऐक ना. मला फक्त पुष्करबरोबर जायचंय खाली. तू काहीतरी कारण काढून सटक ना… म्हणजे आता येताना काय केलंस i don’t know पण तसंच काहीसं कर… मला जाम मजा आली. मी त्याला अशक्य blackmail केलं.”

“काय म्हणालीस?”

“मी म्हणाले की मानसीला तो manny वाईट बोलला तर चालेल का तुला? Full घेतली त्याची. तो जरा शामळूच आहे. पण मला असाच मुलगा हवाय. आकाशला फार अक्कल होती. त्याचाच वैताग आला होता. शामळू मुलं जरा बरी पडतात.”

मानसी ऐकून घेत होती पण काही बोलायची इच्छा झाली नाही तिला.

“Anyways मी जरा menu आणते.”

कस्तुरी घाईत वळली आणि एकदम धडकली. मागे पुष्कर उभा होता. सगळं ऐकत. कस्तुरीला शब्द फुटेना. मानसीलाही. पण पुष्करनं कस्तुरीच्या हातात menu दिला. त्यानं नक्की किती ऐकलं किती नाही हे कस्तुरीला कळलंच नाही पण नको ते मात्र ऐकलं आहे हे त्याचे डोळे बघून मानसीला मात्र समजलं होतं… पुष्कर टेबलवर बसत म्हणाला.

“मी एक cheese omelette खाईन”

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: