तू समोर आलीस की वाटतं
तेव्हा धाडस करायला हवं होतं
लग्न कर असा हट्ट नाही
पण नुसतं शेजारी बस म्हणायला हवं होतं
कधीतरी न्यायला हवं होतं टेकडीवर
मनसोक्त हसवायला हवं होतं
पटकन हात घ्यायला हवा होता हातात
झटकायच्या भितीला पचवायला हवं होतं
सुंदर दिसतीयेसला सुंदर दिसतेस म्हणायला हवं होतं
छान हसतेसला मीच हसवलंय हे म्हणायला हवं होतं
पाठवायला हवं होतं एखादं पत्र
निनावी तर निनावी
होणाऱ्या नवऱ्याला द्यायला हवी होती एखादी धमकी
पोकळ तर पोकळ
किमान आज तुझ्यासमोर बसताना
मनाचं जडत्व टाळायला हवं होतं
जे ते ज्या त्या वेळी समोर
मांडायला हवं होतं
म्हणजे आता या टेबलवर नसलो असतो
तू, मी, तुझा नवरा आणि माझी बायको
तुझ्या नवऱ्याला आलीसंच घेऊन
निदान माझ्या बायकोला बोलवायला नको होतंस
मी केलाच धांदरटपणा
पण निदान तू समजून घ्यायला हवं होतंस
ही तुझ्याकडे बघायची एक संधी
त्याला असं कौटुंबिक करायला नको होतंस
तंद्री मोडण्यासाठी टेबलखालून मारलेल्या पायाला
सॉरी म्हणत बंबाळ करायला नकोस होतंस
नवऱ्याचा हात न सोडताच हात मिळवलास तरी
वर्गमित्र ऐवजी माझा जिवलग मित्र तरी म्हणायला हवं होतंस…
Sunder….
LikeLike