आपल्याला आत्ताच आवडलेला किंवा आवडायला लागलेल्या मुलावर आपल्या जवळच्या मैत्रिणीनी claim सांगितला तर काय करायचं असतं हे मानसीला अजिबात समजत नव्हतं. तिनं समोरच्या तीन रस्त्यांकडे आणखी एकदा नजर टाकली आणि गाडी बाजूला घेतली. पुष्कर फारच आनंदात उतरला.

“Thank god थांबलीस. माझी अशक्य फाटली होती. आणि किती fast चालवतेस मानसी… मला जगायचंय अजून. अशा rate नी मुळशीतंच पुरावी लागेल माझी body!”

मानसी हसेल अशी पुष्करची अपेक्षा होती पण ती गप्पच राहिली.

“कसला विचार करतीयेस??”

“काही नाही.”

“Please हळू चालव नं जरा… मी पहिल्यांदा bike नी मुळशीला चाललोय.”

“मी पण…”

“म्हणजे?”

“मी पण पहिल्यांदा bike नी मुळशीला चाललीये.”

“Are you mad???”

“का? mad चा काय संबंध!”

“हो मग काय… केवढी खोटारडी असशील तू… मला सरळ म्हणालीस की दर Sunday ला जाता मुळशीला.”

“हो. जातोच आम्ही दर sunday ला… पण कस्तुरीच्या मित्राच्या car नी. तिची आई तिला अजिबात सोडत नाही आणि कस्तुरीचा boyfriend मागे लागत राहतो की जाऊया जाऊया… पण  घरी नुसतं चलन टाकून भागत नाही, तिची आई मध्ये मध्ये whatsapp video call करते. त्यामुळे मला compulsory जावं लागतं. Call आला की कस्तुरी घेणार आणि background ला मी. Call ठेवला की मी background ला आणि boyfriend focus मध्ये!”

“तो नक्की तिचा boyfriend आहे की मित्र आहे.”

“का तुला काय करायचंय??? तुला काय ती आवडायला लागली का??”

मानसी एकदम ओरडलीच. तसा पुष्करचा प्रश्न इतका odd नव्हताच. पुष्कर react होणार इतक्यात कस्तुरी त्यांच्यापाशी येऊन थांबली.

“मानसी… फोन आलेला त्यांचा.”

“कोण ते?”

मानसीचा वैताग continue झाला.

“आपण ज्यांना चुकवून आलोय ती दुसरी पार्टी. ते येतायेत. आपल्या चांदणी चौकात थांबायला सांगितलंय.”

“तू का फोन उचललास???”

“Sorry… मला वाटलंच की आता तुझ्या शिव्या ऐकाव्या लागतील.”

“मग चल आता लवकर. ते यायच्या आत सटकू.”

“आणि नंतर काय उत्तर द्यायचं त्यांना?”

“ऐकूच आलं नाही फोनवर असं म्हणायचं.”

“पण मी म्हणाले की हो हो या… आम्ही थांबतोय. ते त्यांना ऐकू गेलंय.”

मानसी जाम वैतागली होती. कस्तुरीकडे रोखून बघत होती. पण तिनं कस्तुरीला काहीही म्हणायच्या आतच कस्तुरीनं तिला डोळ्यांनी लांब जा असा इशारा केला. मानसीचा चेहरा पडला पण ती आलेच म्हणून फोन कानाला लावून लांब गेली. त्यानंतर कस्तुरी आणि पुष्कर तिला हसून बोलताना दिसत होते पण नक्की काय बोलतायेत ते मात्र ऐकू येत नव्हतं. मानसीचा तीळपापड होत होता. इतक्यात मागून एक हात तिच्या गळ्यात आला.

“hey… unfortunately Binny येत नाहीये… तर तुझ्या ह्या चंपक मित्राला कटवतेस का? आपण एका bike वर जाऊ… I will ride!”

मानसीला हे अगदीच unexpected होते. काहीही काय??? तिला आतल्या आत तिचा आवाज ऐकू आला.

“hold on! तो मित्र चंपक नाहीये आणि I want to ride my bike!”

“But मी मागे बसू शकत नाही नं तुझ़्या!”

“का?”

“Because I can’t sit behind a girl!”

“Yeah you can’t. कारण मीच माझ्या मागे तुला बसू देणार नाही. पुष्कर बसणार आहे.”

मानसी हे बोलली आणि तोऱ्यात पुष्कर कस्तुरी समोर येऊन उभी राहिली.

आणि पुष्कर एकदम म्हणाला,
“मानसी… मला नाही वाटत मला एकदंर हे सगळं प्रकरण झेपेल. मी जातो घरी… तू यांच्याबरोबर जा नं फिरायला. नंतर फोटो पाठव मला.”

मानसी त्याचं तोंड दाबणार इतक्यात तिला मागे येऊन उभा राहिलेला Manny दिसला.

“कस्तुरी या माणसाला इथून जायला सांग. हा माझ्या डोक्यात जातोय.”

कस्तुरी काहीच न बोलता शांतपणे उभी राहिली.

“काय झालं मानसी? एवढी का चिडतीयेस?” पुष्कर जरा घाबरतंच म्हणाला.

“एकतर मुलींना respect देत नाही हा आणि वर flirt करतोय.”

यावर पुष्करला react करता आलं असतं तर त्याला १० वीतच girlfriend मिळाली असती.

“पुष्कर. मला मुळशीला जायचंय आणि तू माझ्यामागे बसून येतोयस. Period!”

मानसीनं थेट bike काढली. कस्तुरीही तेच करेल अशी तिची अपेक्षा असताना कस्तुरी हललीच नाही. पुष्करही नाही.

“पुष्कर! मागे बस.”

“मानसी हट्टीपणा करु नकोस. आपण सगळे एकत्र जाउया. गाडीबिडी बंद पडली मध्ये तर काय करणारेस?” कस्तुरी पुष्करजवळ सरकत म्हणाली. पुष्कर मात्र घाबरुन मागे बसला आणि मानसीनं accelerator पिळला सुद्धा.

“मानसी please बाकी काहीही सांग मला करायला मी करेन… पण bike हळू चालव please!”

मानसी हसली आणि दोघं तिच्या bike वर आरामात highway ला लागले. खरं सांगायचं तर पुष्करला प्रचंड भारी वाटत होतं. काल जी मुलगी पहिल्यांदा दिसली आणि आवडली तिनं आज पुष्कर बरोबरच bike ride ला जायचं असा हट्ट धरला होता. पुष्करनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती सुद्धा आरशातून त्याच्याकडे बघून हसत होती. गाडीचा speed 80 आणि छोटी गावं पास झाली 40-60 असा होता. मानस लेक गेला. त्या घाटासारख्या छोट्याशा वळणावरुन खाली रिकामी दिसणारी जमीन पुष्करनी डोळे भरुन बघितली. छाती भरुन श्वास घेतला. मानसीला ते जाणवलं. तिनं bike बाजूला घेतली.

“फोटो काढुया?”

“नको. आधी नुसतं बघुया!”

पुष्कर कठड्यापर्यंत गेला. त्यानं खाली वाकून बघितलं.

“कसलं भारी वाटतंय. Thanks मानसी… मी लोळत पडलो असतो घरी सोफ्यावर. त्यापेक्षा हा असला top class view बघतोय तुझ्यामुळे!”

“मला पण बघायचाय.”

“मग बघ ना. ये पुढे.”

“मला height चा phobia आहे पुष्कर. आम्ही दर sunday ला इकडून जातो तेव्हा मी नेहमी मनाशी म्हणते की त्या दोघांबरोबर नाही पण मी आपली आपली येईन एकदा इकडे आणि असं वाकून बघेन खाली.”

“मग?”

“मग काही नाही. मी खूप घाबरट आहे. मला highways ची भीती वाटते. खूप! Trucks आणि speed… दोन्हीनी पोटात गोळा येतो माझ्या.”

“तू नक्की rider आहेस ना?”

“मी डोळे मिटून घेते ना… तर मला वाटतं की मी प्रचंड speed नी चाललीये. रस्त्यांवर…”

“कुठल्या specific? की general?”

“North च्या… may be Delhi… आणि लेह लडाख…”

“अति videos बघतेस बहुतेक म्हणून असं होतं.”

“कशावरुन?”

“मी पण खूप बघतो.”

“मग तुला पण होतं तसं?”

“नाही…”

“I want to be a rider!”

“Bike आहेच की तुझ्याकडे…”

“I know… Passion पण आहे… पण company नाहीये.”

“Riders ना company लागते? मला वाटलं सामान बांधतात आणि सुटतात.”

“मी बांधलं सामान तर सुटशील माझ्याबरोबर?”

“तू वेडीएस का जरा? आपण काल भेटलोय आणि तू एवढा विश्वास का ठेवतीयेस? मी काही केलं तुला तर?”

मानसी एकटक पुष्करच्या डोळ्यात बघत होती आणि तिची तंद्री मोडली ती पुष्करच्या आईच्या call नी.

“हॅलो… हो… नाही… hmmm… आई please… नाही… नाही तो जरा लांब गेलाय. नाहीये अात्ता. अगं नाहीये. गेलाय cigarette आणायला. अरे यार काय त्रास आहे?? एक सेकंद hold कर.”

पुष्कर complete वैतागला होता. नाईलाजानी तो मानसीपाशी आला.

“एक request ए…”

“बोल ना. एवढा का awkward होतोयस?”

“माझ्या आईशी बोलतेस?”

“का?”

“मी bike ride ला पहिल्यांदाच आलोय. So तिला confirm करायचंय…”

“काय? की तू कुठे मित्राकडे दारु पीत पडला नाहीयेस आणि चांगल्या संगतीत आहेस?”

“नाही. की मी मित्राकडे अभ्यास करत नाहीये आणि खरंच मजा करतोयस..”

“दे…”

पुष्करनी फोन दिला. Fingers cross करुन डोळे मिटून तो उभा राहिला. मानसी पुढे पाचेक मिनिटं तरी आईशी बोलत होती. मन लावून. पुष्करला हायसं वाटलं. त्यानं cross केलेली दोन्ही बोटं सोडली आणि इतक्यात मानसीनं फोन ठेवून दिला.

“तुझी आई तुझ्यापेक्षा जास्त happening आहे!”

“I know!”

“पण मला राग आलाय तिचा…”

“का?”

“ती मला bye कस्तुरी म्हणाली फोन ठेवताना!”

“Shit!!! मानसी actually”

पुष्कर काही म्हणेपर्यंत मानसीनं ढांग टाकली होती आणि ती निघूनही गेली. तसं त्या दोघांच्यात काहीही नसलं तरी अजून काही build होऊ नये अशीच ही गोष्ट होती. मानसी परत येईल या आशेत पुष्कर बसून राहिला. ५-१०-१५ मिनिटं झाली पण ती आली नाही. पुष्कर तसाच बसून राहिला. ऊन डोक्यावर चढत होतं. त्या जवळची झाडाखाली असलेली कट्ट्याची बाजू निवडली आणि आडवा झाला. वर झाडाची पानं डोलत होती. लहानपणी एक प्रकारचं फळ एकमेकांना मारुन मित्र पळून जायचे. आज ते फळ त्याला कित्येक वर्षांनी दिसलं होतं. पुष्करनं डोळे मिटून घेतले. डोळ्यांनी कितीही गोष्टी बघितल्या तरी डोळे बंद केल्यावरच त्याचा अनुभव होतो. घरी कसं जावं याचा अजिबात विचारही केला नाही त्यानं. त्या झाडाच्या सावलीत आणि प्रचंड शांततेत त्याला खूप निवांतपणा जाणवत होता. डोक्यावर सूर्य आला असला तरी वाऱ्याच्या झुळुकेत गारवा होता. रस्त्यावर उतरुन कधी आपण इतक्या बारकाव्यांचा विचारच का केला नाही? हा एकच विचार त्याच्या मनात घोळत होता.

“पुष्कर?… पुष्कर!!!”

आधी हाक आणि मग एका हाताचा त्याला स्पर्श झाला. पुष्करनं किलकिले डोळे उघडले आणि तो खडबडून जागा झाला. त्या उन्हाच्या backlight मुळे त्याला चेहरा दिसत नव्हता पण हसरे ओठ मात्र स्पष्ट दिसत होते. त्यानं पक्कं ओळखलं होतं की आता काही खरं नाही…

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: