पुष्कर कसेबसे डोळे चोळत उठला. ब्रश करुन पाणी प्यायला किचनमध्ये आला आणि त्याच्या कानावर चुर्‌र्र असा आवाज पडला. इतका वेळ जवळ जवळ sleep walk करणारा पुष्कर त्या आवाजानं आत्ता कुठे जागा झाला आणि मागे बघतो काय? तर आई चक्क चक्क धिरड्यावर तेल सोडत होती.

“उपाशी पोटी जाणारेस का? मग मलूल होऊन पेंगत बसशील त्या कस्तुरीच्यामागे. छान डाळीचं पीठ, मूग घालून तांदळाची धिरडीची केली आहेत.”

“आई रात्रीचे साडे तीन वाजलेत.”

“खरंतर अडीच वाजलेत पण मला भूक लागलीये.”

“अडीच?”

“मग आता आंघोळ पांघोळ करुन नळस्टॉपला पावणे चारला पोचायचं तर अडीचला नको उठायला? वेळेत गेला नाहीस तर सोडून जाईल ती कस्तुरी!”

“तू का वाचलेस मेसेजेस?”

“मला control च होत नाही.”

“आईsssss”

“ओरडू नकोस, आंघोळीला जा!”

“मी नाही करणारे आंघोळ!”

“मग काय वास मारत राहणारेस दिवसभर?”

“मी गटारात लोळून आलो नाहीये वास मारायला!”

“मुलीला मिठी मारायला स्वच्छ आंघोळ करुन जा हे सु्द्धा मी सांगायचं का आता तुला?”

“मी मिठी मारणार नाहीये कोणाला!!!”

“म्हणूनच कोणाचं काही होईना अजून group मध्ये. जाऊ दे बाई. मी खाऊन घेते. तू तुझी आंघोळ झाली की ये खायला.”

“आम्ही नळस्टॉपला नाश्ता करुन पुढे जाणार आहोत.”

“मी तुला पोटभर खायला घालूनच बाहेर पाठवणार आहे.”

पुष्कर न बोलता आत निघून गेला. आज दुप्पट साबण लावून त्यानं स्वच्छ आंघोळ केली आणि तीन धिरडी खाऊन तो बाहेर पडला. Rock climbing चे shoes आणि बाकी सगळे gears घालून पुष्कर निघाला. सगळं आवरुन निघता निघता उशीरच झाला होता त्यामुळे त्याची activa हाणत तो चालला होता. Activa चा खडखड आवाज, जवळजवळ लटकणारा silencer आणि नसल्यात जमा झालेले shock absorbers त्याच्या बरोबरीनं पळत होते. पुष्कर एकदाचा नळस्टॉपला पोचला. त्यानं घड्याळ बघितलं तर ३.५५ झाले होते. वेळेपूर्वी आल्याचं त्याला भारी वाटलं. पुष्करनं एक गरमागरम चहा घेतला आणि त्याला बुलेटची धडधड ऐकू आली. एका नाही. अनेक. तो भाजणारा ग्लास कसाबसा हातात सामावून पुष्कर फुटपाथपाशी गेला. लायनीनं एक दोन तीन चार अशा बाईक्स लागल्या. पहिल्या बुलेटवरुन ढांग काढून मानसी उतरली. डोक्यावरचं हेलमेट काढून तिनं मोकळे केस मागे टाकले. दुसऱ्या बुलेटवरुन अजून एक मुलगी उतरली. ती कदाचित कस्तुरी असावी. छोटीशी, घारी, गोरी, भुऱ्या केसांची आणि खळखळून हसणारी. तिचं हेलमेट तर पुढून almost open होतं. त्यामुळे तिचा चेहरा सतत दिसत राहणारा होता. तिसऱ्या sports bike वरुन एक मुलगा उतरला, त्याच्या मागे त्याला चिक्कट्टून एक मुलगी बसली होती. ती ही उतरली. आणि चौथ्या बाईकवरुन एक माणूस… साधारण ३५ शीचा असावा. तो उतरला. मानसी प्रसन्न चेहऱ्यानं पुष्करपाशी आली.

“hey”

“hi”

“तुझी ओळख करुन देते. हा प्रवीण… ही त्याची girlfriend आकांक्षा. तो मनोज. Manny म्हणतात त्याला सगळे. आणि ही कस्तुरी. माझी bff… best friend forever!!!”

“मी पुष्कर.”

“We know! कालपासून तुझ्याचबद्दल ऐकतोय.” कस्तुरी blush होत म्हणाली आणि मानसीनं तिला जोरदार फटका दिला. मग कस्तुरी खायला आणायला गेली.

“मानसी, अगं मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटतोय. आधीच माझी तुझ्याशी काही ओळख नाही. त्यात आता अजून नवीन लोकं.”

मानसीनं पुष्करचा दंड धरुन त्याला बाजूला घेतलं. हक्कानी.

“मी पण या सगळ्यांना पहिल्यांदाच भेटतीये.”

“म्हणजे?”

“म्हणजे कस्तुरीचा मित्र. आता मित्र जो परवा पर्यंत boyfrind होता. आकाश. म्हणजे officially आत्ता सुद्धा boyfriend च आहे कारण break up झालं नाहीये. त्या आकाशचा मित्र आहे प्रवीण… प्रवीणची girlfriend आकांक्षा आणि आकांक्षाचा भाऊ आहे Manny.”

“पण हे सगळे का आलेत?”

“Good question! Actually प्रवीण analyse करायला आलाय की कस्तुरीचं आकाशशी break up का होतंय. आणि त्याची girlfriend free parcel आलीये कारण त्यांचं आत्ताच जमलंय आणि त्यांचा पहिला एकत्र day out आहे. आणि म्हणून तिचा भाऊ compulsory आलाय.”

“त्या भावाला कामधंदे नाहीयेत का? या couples मध्ये तो bore होईल.”

“नाही कारण Manny ची girlfriend Binny पण येतीये.”

“What?”

“Thank god पुष्कर! मी कस्तुरीला हे सांगितलं तर ती म्हणाली Wow!! Such a big group! At least तू तरी normal आहेस.”

मानसीनं पुष्करचा दंड एकदम सोडला. तिनं तो धरुनच ठेवलाय हे तिला एव्हाना कळलं नव्हतं.

“धरु शकतेस तू. मला चांगलं वाटत होतं.” पुष्कर बोलून गेला. तसं त्याला त्याचे मित्र हजारदा ओरडायचे की मुलगी हवी असेल तरी honesty फक्त दाखवावी लागते. खरंच करायची नसते पण पुष्करला ते जमणं अशक्य होतं. त्याचं बोलणं ऐकून मानसी एकदम मागे झाली.

“मनु… पोह्यात बघ सांबार किती ओतलंय यानी. I know तुला तसं आवडत नाही पण sorry. त्यानी विचारलंच नाही की सांबार घालू की नको.”

“मी खाऊ हे पोहे? मला चालेल सांबार.” पुष्कर पुढे सरसारवला.

“Almost आमटी भात केलाय त्याचा…” मानसी पोह्यांकडे कसंतरीच तोंड करुन बघत होती.

“It’s okay. मला चालेल.” पुष्करनं घाईनं plate घेतली आणि खायला लागला. मानसीनं कोरड्या पोह्याची दुसरी dish मानसीला दिली.

“मगाशी तू म्हणालास की धर हात चांगलं वाटतंय.”

“धर नाही म्हणालो. धरु शकतेस असं म्हणालो. धर ही order झाली. धरु शकतेस हे suggestion झालं.”

“Oh I see…”

“Yeaaa…” पुष्कर निरागसपणे म्हणाला.

मानसी आपली मजा उडवतीये हे पुष्करला कस्तुरी आणि मानसी टाळी देऊन खिदळल्या तेव्हा समजलं.

“So म्हणजे तू कायम सगळ्याच मुलींशी असं wanna be वागतोस का?”

“मी honest वागतो.”

कस्तुरी आणि मानसी परत एकदा हसल्या.

“तू पण काय प्रत्येक वेळी मैत्रिणीसमोर सगळं बोलतेस का?”

“हो. Bffs मध्ये secrets नसतात.”

“I see…”

पुष्करला हसायचं होतं पण कंपनी नव्हती. प्रवीण, आकांक्षा आणि Manny वेगळीकडे उभे होते.

“कस्तु… एकदा फोन लाव नं आकाशला. कुठे पोचलेत विचार…”

“कुठे पोचलेत? एवढा आदर…”

“नानाची टांग त्या आकाशच्या. आदर म्हणे. त्या Manny च्या Binny ला वाघोलीवरुन pick up करुन येतोय आकाश. ते दोघं कुठे पोचलेत असा प्रश्न आहे.” मानसीच्या मनातून कस्तुरीसाठी तो आकाश पूर्णपणे उतरला होता हे नक्की.

”कस्तुरीचा आकाश Manny च्या Binny ला ओळखतो का?” पुष्करनं शंका विचारुन घेतली.

“हे बघ मला माहीत नाही. ती वाघोलीला राहते, तो विमाननगरला. ते एकमेकांना ओळखोत, न ओळखोत काहीही करोत. I don’t care… वेळेवर या आणि आम्हाला उशीर करु नका एवढाच concern आहे.” मानसीचं म्हणणं clear होतं.

“Binny चा मेसेज आलाय. ते रस्ता चुकलेत.” कस्तुरीनं तोंड वेंगाडत सांगितलं.

“कस्तु… एक idea!” सरळ सरळ पुष्करला एकटं पाडून दोघी एकमेकींच्या जवळ आल्या आणि कानात काहीतरी कुजबूज केली. दोघींना गपागप पोहे संपवले आणि dish ठेवून दिल्या.

“पुष्कर… इकडे ये… जवळ ये नं… I mean कान इकडे कर…” पुष्करनं आपलं प्रमोशन झाल्यासारखा राजीखुशीनं कान पुढे केला.

“वेडीएस का मानसी… कसं शक्य आहे?? मला नाही जमणार हे… तुम्ही मुली काय हुकलाय का?” पुष्कर अंगावर झुरळ पडल्यासारखा तो thought झटकत होता.

”तूच पडलायेस का डोक्यावर?? नसतं लटांबर कशाला करायचं सहन?” मानसी मान्यातल्या तलवारीवर हात ठेवून उभी होती.

“हळू बोल नं. त्यांना ऐकू जाईल…” पुष्करनं almost तिचं तोंड दाबलं. पण मानसीनं लक्ष दिलं  नाही. तिनं हळूच हेलमेट घातलं. कस्तुरीनं ही घातलं. प्रवीणच्या group चं लक्ष नव्हतं. दोघी पटापट आपापल्या bikes वर बसल्या. Bikes सुरु केल्या आणि मानसीनं पुष्करकडे शेवटचा look टाकला. प्रवीणच्या group चं अजूनही लक्ष नव्हतं. पुष्कर मानसीच्या मागे जाऊन बसला आणि तिनी accelerator पिळला. रिकाम्या कर्वे रोडवर bike सुसाट पळवली. पुष्कर त्या हिसक्यानं मागेच पडणार होता. मागे धरायला काही सापडेना म्हणून त्यानं मानसीच्या खांद्यावर हात घट्ट रोवले. त्याची रुतणारी बोट मानसीला जाणवली आणि खदाखदा हसत ती आरशातून पुष्करकडे बघू लागली. तो डोळे मिटून बसला होता.

“तू धरु शकतोस मला.”

“धरु का?”

“धर अशी order सोडत नाहीये. Just a suggestion”

पुष्कर बंद डोळ्यातूनच हसला आणि त्यानी मानसीला घट्ट मिठी मारली. मानसीला ही त्याची honesty आणि घट्ट असली तरीही ती मिठी दोन्ही आवडत होतं. त्याच्या मिठीत पूर्णपणे भीती होती. बाकी काहीही नाही. कदाचित गाडीचा speed कमी केला तर त्यानं ही मिठी सोडूनही दिली असती. मानसीनं speedometer 80 ला touch केला आणि तसाच maintain ही केला. मानसी स्वतःशीच आनंदात असताना तिचा फोन वाजू लागला. कानात earphones होते. ती आणि कस्तुरी bikes चालवताना emergency talks साठी अशा connect व्हायच्या.

“K A S T U calling…” असं मानसीच्या कानात वाजतंच होतं. तिनं फोन घेतला.

“मनु… आकाशशी break up final!!!”

“मधूनच काय झालं आता?”

“I think I like him…”

“कस्तु… आत्ता break up final म्हणालीस नं???”

“hmmm. I think I like… I like Pushkar… he is so innocent!”

मानसी एक सेकंद गारच झाली.

“काय म्हणालीस तू??”

“I think I like Pushkar…”

वाऱ्याच्या आवाजात कस्तुरीचा आवाज नीट ऐकून येत नव्हता म्हणून मानसीनं स्वतःच्या कानांना, मनाला आणि मेंदूला एक chance दिला. तसा तिला पुष्कर आवडतोय असं अजून तरी काही नव्हतं. पण ही शक्यताच cancel करायला तिला जड गेलं. मानसीला आता काय react व्हावं कळेना. शब्द सापडेना… आत्तासाठी फोन कट करुन थोडा वेळ घ्यावा असं तिला वाटलं. ती फोन कट करणार इतक्यात कस्तुरी परत बोलायला लागली.

“पण त्याला तू आवडतेस का? कसली मस्त मिठी मारुन बसलाय!!”

हे ऐकून मात्र मानसी जराशी गोंधळली… दचकली आणि तिचा speed कमी झाला. 80 ला पोचलेला speedometer हळूहळू खाली 70 60 50 करत करत 20 ला आला. ती आरशातून पुष्करकडे बघायला लागली. का बघायला लागली माहीत नाही पण त्यानंही आरशात बघितलं तर एक eye contact शक्य होता आणि तो तिला चालला असता. पण eye contact तर दूरच, पुष्कर मिठी सोडून स्वतःही दूर झाला. ताठ बसला. दोघांत अंतर ठेवून.

“Thanks मनु…” मानसीच्या कानात कस्तुरीचे शब्द आणि त्याबरोबरचा वारा जवळ जवळ घुमला.

“My pleasure!” मानसीनं फोन कट केला.

आरशात बघणं टाळून मानसी अख्खा वेळ टक्क डोळ्यांनी समोर बघू लागली. चांदणी चौक आला होता. तिचं हसू, तिची excitement विरली होती… समोरच्या तीन रस्त्यांपैकी नक्की कुठला रस्ता घ्यायचाय हेच तिला कळेनासं झालं…

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: