काही तासांपूर्वी पुष्करला मानसी आवडली होती आणि आता तिचा नंबर त्याच्या समोर होता. त्याला लगेच नंबर घ्यावासा वाटला. पण कसा घेणार? असा एका मुलीचा नंबर direct एका मित्राकडून घेतला तर कसा wanna be वाटेन मी?? “नको सुम्या… परत कधी भेटली तर मी करेन ओळख…” सुमेध पुष्करवर प्रचंड हसला! “साला मला कोणी असा नंबर देऊ केला असता ना… काय सांगू!” पुष्करनं त्याच्या चहाचा शेवटचा घोट प्यायला आणि तो पैसे देऊन निघाला ही! त्याला कायमच सगळे त्याच्या घाबरट behaviour वरुन बोलायचे, टोमणे मारायचे पण तो मनात म्हणायचा, “तुम्हाला काय कळणार घाबरट आणि dignity मधला फरक”… असं मनात म्हटलं की पुष्करला हायसं वाटायचं, स्वतःचा अभिमान वाटायचा पण त्यानं आज मनात असं म्हटलंच नाही. उलट तो अस्वस्थ होता कारण  त्यानं मानसीच्या नंबरकडे बघितलं होतं. किमान २ सेकंद बघितलं होतं. पुष्कर एकपाठी होता. त्याची इच्छा नसताना १० च्या १० digits त्याच्या डोक्यात नाचायला लागले. त्याला स्वतःची dignity हरवल्याचीच भावना येत होती. पुष्करनं नंबर उलट सुलट करुन म्हणायचा प्रयत्न केला पण तो नंबर असा बसला होता की आता बाहेरच पडेना. तो घरी आला. येताना आलेली सर त्यानं गाडी बाजूला चुकवली नव्हती. तो गच्च भिजून घरी आला होता. आई मागे फिरत होती. टॉवेलनं डोकं पूस. गरम चहा करु का? काढा हवाय का? आंघोळ करतोस का कढत पाण्यानी? पण पुष्करचं लक्ष नव्हतं. तो खोलीत गेला. तसाच ओला बेडवर बसला आणि त्यानं फोन नंबर त्याच्या मोबाईलवर टाईप केला. आता dial करावा का नाही? हा प्रश्न होता. आईचा आवाज बंद करण्यासाठी त्यानं खोलीचं दार लावलं. नंबर डायल केला. ring वाजली. पलीकडे ring जाण्याचा आवाज. आता मात्र अचानक हातपाय गार पडायला लागले. मानसीनं फोन उचलला.

“हॅलो…”

“हॅलो…”

पुढे काही क्षण शांतता. काय बोलावं त्याला कळेना. आपण नक्की कशासाठी फोन केलाय? पुष्कर blanck झाला.

“हॅलो. हॅलो… हॅलो…”

“हॅलो.”

“हॅलो. कोण बोलतंय?”

“कोण नाही…”

“पुष्कर नं?”

“कोण पुष्कर?”

“ते तू सांग मला. तू पुष्कर आहेस.”

“मग तुला कसं कळलं की मी पुष्कर आहे.”

“मला truecaller वर नाव दिसलं.”

“मी तुला गाडीपर्यंत सोडायला आलेलो…”

“आणि bike चालवता येत नाही तो?”

“हो. नाही. कसं कळलं मला bike चालवता येत नाही?”

“सुमेध! दुसरं कोण!”

“असं काही नाही. मला येते.”

“Okay. पण फोन का केलायस?”

“मला सुमेधनी नंबर दिला…”

“मग?”

“मग काही नाही…”

“मग फोन का केलायस??”

“माहीत नाही.”

“त्यानी तुला नंबर दिला आणि तू फोन केलास?? काहीतरी ठरवलं असशील नं काय बोलणार?”

“नाही.”

“तू mad आहेस का?”

पुष्कर सुन्न.

“मी ठेवतीये.”

मानसीनं फोन ठेवून दिला. पुष्करला काय करावं कळेना. त्यानं towel घेतला. विचार करत एक तासभर गरम पाणी घेतलं. परत एकदा ring वाजली.

“बोल पुष्कर…”

“तुला माझा नंबर लक्षात आहे??”

“नाही.”

“मग कसं कळलं मी बोलतोय?”

“तू मंद आहेस का जरा? Truecaller वर दिसलं.”

“oh!”

“तू घरी पोचलीस का?”

“हो. केव्हाच.”

“अच्छा!”

“फोन का केलायस?”

“तू म्हणालीस नं की काहीतरी ठरवलं असशील की काय बोलायचं.”

“हं… मग? काय ठरवलंस.”

“हेच. घरी पोचलीस का विचारावं…”

शांतता.

“तू माझी खेचतोयस का?”

“नाही.”

“मग काय करतोयस? पडलायेस डोक्यावर?”

“का चिडतीयेस? तू म्हणालीस की काहीतरी विचार करुन फोन कर म्हणून मी केलाय.”

“फोन केलायस पण विचार काय केलास?”

“हेच… की बोलुया.”

“मग बोल.”

“मानसी.”

“काय?” “मला नाही येत बाईक चालवता.”

“ते मला तुझं तोंड बघूनच कळलं होतं.”

“सॉरी.”

“सॉरी? बाईक चालवता येणं हे madatory skill नाहीये पुष्कर.”

“I know पण पुण्यात सगळ्यांना येते.”

“Fuck do I care!”

“oh! Thanks…”

“स्वयंपाक येतो का? ते madatory skill आहे.”

“नाही actually आई करते.”

“wow!”

“माझी image खराब झाली का तुझ्यासमोर?”

“असेल किंवा नसेल. काय फरक पडतो?”

“मला मैत्री करायची होती.”

“का?”

“ते मी फोटोज बघितले facebook आणि insta वर… तू तुझ्या friends ना ride वर नेतेस.”

मानसी खळखळून हसायला लागली.

“Ok… मग मी उद्या सकाळी मुळशीला चाललीये. येतोयस का?”

“मुळशीला का?”

“breakfast करायला.”

“एकटी?”

“नाही. माझी अजून एक मैत्रीण आहे. आम्ही दोघी दर sunday ला जातो. तिच्या मागे तिचा boyfriend… boyfriend नाहीये as such… तिचा एक मित्र असेल. मला pillion rider नाहीये. तू येऊ शकतोस.”

“ok. खूप लांब आहे का?”

“नाही. ४०-५० किलोमीटर असेल. हेलमेट घालून ये आणि jacket, आणि शूज. पाण्याची बाटली पण आण. मी share करत नाही पाणी. Gloves असतील तर घाल. नसतील तर not a big deal.”

“ok. कुठे येऊ?”

“नळस्टॉप. ४ वाजता भेटू.”

“४???”

“हो. कारण आम्ही पोहे खाऊन निघतो.”

“आपण breakfast लाच जाणार आहे न?”

“हो पण आम्हाला दोघींना सारखं खायला लागतं. Any problem?”

“नाही. तुमच्या पैशानी खाणार तुम्ही. हवं तेवढं खा.”

“नाही. तुझ्या पैशानी खाणार. तुला फुकट एक lifetime experience मिळतोय… त्याचे charges समज.”

मानसीनं फोन ठेवला. पुष्करचा आनंद अशक्य अशक्य वरच्या पातळीच्या गगनातही सामावत नव्हता. फक्त आता घरी खोटं बोलावं लागणार होतं. पुष्करची आई ही एक असामान्य व्यक्ती होती. त्यामुळे bike ride ते ही एका मुलीबरोबर हे पुष्कर या जन्मात घरी सांगू शकणार नव्हता.

पुष्करचे बाबा घरी आले, मग जेवणं झाली, मग TV… मग कुठे ११-११.३० ला घरातले दिवे बंद झाले. पुष्करनं सगळे झोपायची वाट बघितली. मग हळूच त्यानं कपाटावरचं हेलमेट काढायला, हॉलमधून एक stool आणलं. आवाज न करता अलगद तो त्या stool वर चढला आणि धुळीनं माखलेलं हेलमेट खाली काढून ते स्वच्छ पुसलं. आई हेलमेट वापर असं १२० वेळा म्हणाली होती. पण  hair cutting चा कंटाळा केल्यानं आपोआप केस वाढून चुकून cool झालेल्या hairstyle चा हेलमेटशी ३६ चा आकडा होता. त्यामुळे आईचं बोलणं उडवून लावलं होतं. पण आता हेलमेट शिवाय पर्याय नव्हता. पुष्करनं हॉलमधल्या एका कपाटात शोधाशोध सुरु केली. कमीत कमी आवाज करत शोधत असतानाच अचानक हॉलमधला दिवा लागला आणि आई कमरेवर हात ठेवून मागे उभी होती. पुष्करनं डोळे मिटून घेतले आणि एका दमात बोलून घेतलं.

“आई मी सांगणारच होतो तुला, आम्ही मित्र मित्र उद्या मुळशीला चाललोय bike वर.”

“सुमेध?”

“नाही, नवीन मित्र आहे. मानस.”

“मानस?”

“हो. आणि एकही मुलगी नाहीये.”

“कसा रे असा तू पुष्कर. नेहमीच हे उत्तर देतोस. पुण्यात कोपऱ्याकोपऱ्यावर मुलींची गर्दी असते. त्या सगऴया मुली जातात कुठे?? तू तो सुमेधचा बॅचलर गृप पहिले सोडून दे. एक जिम लाव आणि फॅशन कर जरा.”

“hmmm”

असं म्हणत पुष्कर त्याच्या खोलीकडे गेला. “मानस??” त्याला स्वतःलाच हसायला येत होतं. पुष्कर खोलीत येऊन बेडवर आडवा पडला. त्याला ताबडतोब झोप लागली. आईनं त्याचे ठेवणीतले rock climbing चे shoes त्याच्या तयारीपाशी नेऊन ठेवले आणि खोलीच्या बाहेर पडता पडता नेमका पुष्करच्या फोनचा light लागला. आईनं लगेच बघितलं. मेसेज होता. मेसेज बघून आईचे डोळे चमकले. पाठवणाऱ्याचं नाव होतं ‘मानस’ पण मेसेजमध्ये लिहिलं होतं की “तू जर ४ वाजता नळस्टॉपला पोचला नाहीस तर मी आणि कस्तुरी निघून जाऊ.” “कस्तुरी.” आईचे डोळे विस्फारले. तिनं passcode टाकून फोन unlock केला आणि ३.३० चा अलार्म २.३० चा केला. आई खांदे उडवून स्वतःशीच हसली आणि तिच्या फोन मध्ये ही २.३० चा अलार्म लावून झोपून गेली.

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: