ती एक पावसाळी संध्याकाळ होती. मानसी तिच्या ऑफिसनंतर सरळ घरी जाण्याऐवजी एका कॉफी शॉपमध्ये गेली. गोबऱ्या गालांची मानसी, ती हसली तर समोरच्याला नक्की हसायला येईल अशी. शरीरयष्टी अंगाबरोवर. घट्ट pant आणि त्यावर कुर्ता. मस्त लखनवी fresh sky blue color चा. अत्यंत जड वजनाचे कानात झुमके आणि उतरलेला मेकअप. ती आत गेली. जड पावलांनी. काचेचं दार जोरात ढकलून आत गेल्यावर AC चा गारवा आला आणि फारच भारी वाटलं. तिनी पैशाचा विचार न करता कॉफी ऑर्डर केली आणि बाहेर जाऊन बसली. उकाड्यात, pollution मध्ये, traffic च्या आवाजात. एक टग्या पोरांचा group आधीच तिथे बसून धूराचे लोळ आकाशात सोडत होता. मानसीनी earphones काढून आवडीची playlist लावली आणि नेमका लायटर सापडेना. खिशात शोधाशोध केली, मग पर्समध्ये… पर्समध्ये तर चॉकलेटच्या रॅपरपासून तुटलेल्या झुमक्याच्या मण्यांपर्यंत काहीही होतं पण लायटर काहीकेल्या सापडेना! बहुतेक राहिला ऑफिसमध्येच… तिनं earphones काढले. वेगवेगळे horns चे आवाज कानात घुमायला लागले. आता पायपीट करुन 20 meters वर असलेल्या एका सिगरेटच्या टपरीवरुन लायटर आणावा लागेल ही कल्पना तिला काही फार बरी वाटली नाही. तिनं आजूबाजूला बघितलं. मुलांचा group आणि तिथंनं येणारा धूर तिला दिसला. कशाला हवी सिगरेट टपरी म्हणत तिनं त्यांच्या group कडे कूच केली. खरंतर असा मुलीनं लायटर मागणं काही फार वेगळी गोष्ट नाहीये पण ती वेगळी होते, जेव्हा त्या मुलांच्या group मधले सगळेच single असतात. थोडेसे दाबले गेलेले चित्कार उद्गार निघाले आणि मानसीला ते काही फारसं आवडलं नाही. “लायटर” तिनं आवरतं घेतलं. आधीच mood फारसा बरा नव्हता. त्यांच्यातल्या सुमेध नावाच्या म्होरक्यानं लायटर दिला. ती सिगरेट पेटवत असताना सुमेध तिच्याकडे एकटक बघत होता. “मुलगी बघितली नाही का कधी?” तिनं गुर्मीत त्याला लायटर परत करत विचारलं. “मानसी ना तू? मानसी… काय आडनाव? जोगळेकर…” “करमरकर…” जवळजवळ dragon सारखी आग ओकत मानसीनं त्याला correct केलं. “तेच ते…” “तुझं नाव नाही आठवत…” “कसं आठवेल? तुझा हुश्शार मुलींचा group इतका अकडू होता की आयुष्यात स्वःतची लाल करण्यापलीकडे तुम्हाला काय आलंच नाही… medical ला जाणाऱ्यांचा group ना?? Would be doctors??” मानसी उत्तर न देता तिच्या table वर जाऊन बसली. संभाषण लांबावं म्हणून उगाचच सुमेधनं आगाऊपणा केला होता. सगळे एक सेकंद शांत झाले आणि मग परत गप्पात बुडून गेले. पण त्यांच्यातलाच एक साध्या टीशर्टातमधला, साधा मुलगा मात्र तिच्यावर तिरपी नजर ठेवून होता. Love at first sight नसेल पण त्याचा interest तर वाढला होता. पुष्कर… पुष्कर फणसळकर. मानसीची पहिली सिगरेट संपताना नेमकी तिची कॉफी आली. म्हणून तिनं दुसरी सिगरेट काढली. आता मात्र थेट table वर येऊन न विचारता लायटर घेऊन ती सिगरेट पेटवून मोकळी झाली. मानसीच्या येण्यानं मुलांच्या table वर काही क्षण शांतता पसरली. पण भाव न देता ती निघून गेल्याचं बघून परत सगळे आपापल्या गप्पात रमले. मानसी restless पणे पाय हलवत कोणाची तरी वाट बघत होती.

थोड्या वेळानी एक पन्नाशीचा प्रचंड handsome माणूस तिथे आला. Salt and pepper दाढी, अगदीच चांगलं built आणि प्रचंड fit. त्याच्या हालचालीत एक impressive अदा होती. तो मानसी समोर बसला. मानसीनं काहीतरी कागद त्याच्यासमोर ठेवले. तो भडकला. तिला काहीसं बोलला. तिचा चेहरा पडला. ती रडली. मग tissue paper नी डोळे पुसले. त्यानं तिला त्याचा रुमाल दिला. तिनं घेतला नाही. शेवटी तो उठला. तिच्यापाशी गेला. ती सुद्धा उठली. त्यानं तिला मिठी मारली. मानसीनं अंग चोरुन घेतलं. मानसीला त्याच्या जवळ जाण्यात काहीही interest नव्हता हे स्पष्ट होतं. पुष्कर बारकाईनं हे सगळं बघत होता आणि त्याच वेळी त्याला त्याच्या खुरट्या, न maintain केलेल्या दाढीची, पिळपिळीत पडलेल्या tshirt ची, सुटायला लागलेल्या पोटाची लाज वाटली. मानसी मटकन खाली बसली. डोकं धरुन रडायला लागली. पुष्करच्या इतर सगळ्याच मित्रांचं तिच्याकडे लक्ष गेलं होतं. काय करावं त्यांना कळेना. मग सुमेधनं मागची ओळख असल्याच्या नात्यानं पुढाकर घेतला आणि तो तिच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. तिच्या समोर एक सिगरेट आणि एक लायटर ठेवला. “सॉरी हीच आहे. तुझीवाली नाही पीत आम्ही कोणी.” ती काहीच बोलेना. रडतंच होती. रडतंच राहिली. पुष्करला वाटायला लागलं होतं की आता त्यानं काहीतरी केलं पाहिजे. पण काय? अशा प्रसंगी काय करायचं याचा अनुभव कोणालाच नव्हता. दबकतच तो तिच्या टेबलपाशी गेला. “मी तुला घरी सोडू?” पुष्करनं धाडसानं विचारलं. तिनं हो म्हणून मान हलवली. पुष्करनं त्याच्या गाडीची किल्ली काढत तिची बॅग उचलली. “सोड मी धरते.” असं म्हणत तिनं स्वतःची किल्ली सरकवली. “अच्छा म्हणजे तिच्या गाडीवर सोडायचंय.” पुष्कर मनातल्या मनात खूश झाला होता. त्याचे मित्र त्याच्याकडे चिडवल्याच्या नजरेनं बघत होते. पुष्कर फार काही न बोलता कॅफेच्या बाहेर पडायला लागला. अनावधानानं डावीकडे वळला. काही पावलं चालला आणि मानसी मागे येत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. मागे वळून बघतो तर मानसी काही अंतरावर उभी होती. कॅफेच्या बाहेर पडल्या जसा पुष्कर डावीकडे वळला तशी ती उजवीकडे गेली होती. “हाक माराचयची नं… मी आपला त्या बाजूला जातोय…” पुष्कर तिच्यापाशी पोचला आणि थबकला. मानसी एका बुलेटपाशी थांबली होती. पुष्करनं हातातली किल्ली बघितली. बुलेटचीच होती. मुलगी आपल्याला घरी सोडायला सांगते आहे या विचारात तो इतका आनंदी झाला होता की त्यानं किल्लीकडे नीट लक्ष देऊन बघितलंच नव्हतं. मानसी वाट बघत उभी होती. आयुष्यात पहिल्यांना एका मुलीला घरी सोडायची संधी मिळाली होती, ते सुद्धा समोरुन चालत आलेली आणि मुलीला गाडीवर मागे बसवायचा chance मिळवून देणारी संधी! पण तरीही पुष्करचा चेहरा पडला होता. काही क्षणातच स्वतःला सावरुन तो धाडसानं म्हणाला, “कुठे राहतेस तू?” “नवी पेठ” “हो का? मला बंड गार्डनला जायचंय. मला उलटं पडेल. तू जा आपली आपली.” मानसी जराशी चमकली. कोण मुलग असा chance सोडतो? आणि सरळ जा आपली आपली असं कोण म्हणतं? “अरे केवढंसं आहे पुणे. मला सोड आणि जा”… “त्याला जमत नाहीये तर मी सोडू का?” मानसीनं वळून मागून आलेल्या आवाजकाडे बघितलं. सुमेध ऐटीत रेबॅनचे गॉगल लावून समोर उभा होता. मानसीनं पुष्करच्या हातातून किल्ली घेतली आणि सुमेधला दिली. “पण मी माझी harley असताना तुझी बुलेट का चालवू?” मानसीच्या चेहऱ्यावर एका सेकंदात आनंद पसरला. “Harley??? oh my god! तू doctor झालास का शेवटी?” सगळे हसले. कोणी काही बोललं नाही पण मानसी सुमेधच्या गाडीपाशी जाऊन त्याची गाडी मनापासून न्याहाळू लागली. प्रेमानी हात फिरवत तिनी संपूर्ण गाडीवर नजर टाकली. “Ride पाहिजे?” दिवस इतका खराब गेलेला असताना कोण या offer ला नाही म्हणेल? मानसीनं reflex action नं उत्तर दिलं, “why not?” सुमेधनं गाडीवर ढांग टाकली. मानसी त्याच्या मागे बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते दोघं एका क्षणात डोळ्यासमोरुन नाहीसे झाले. पुष्करवर सगळे हसले. सुमेधचं हे नेहमीचंच आहे म्हणाले आणि आपापल्या वाटेनं घरी जायला लागले. पुष्करचा मात्र पाय निघेना. त्याला तिथेच थांबायचं होतं. ती परत येतीये ना? वेळेत येतीये ना बघायचं होतं. तिच्याशी बोलायचं होतं. ते दोघं जर एकत्र गेले असते bike वरुन तर जे जे बोलणं झालं असतं ते ते सगळं बोलायचं होतं. पुष्कर तिकडे तसाच थांबला. तिच्या bike वरुन हात फिरवत. कोणी ओळखीचं आपल्याकडे बघत नाहीये ना याची खात्री करत! आधी हात फिरवला, मग टेकून उभा राहिला. मग गाडीवर काही क्षण बसला. थोड्या फेऱ्या मारल्या. संधीप्रकाश अनुभवला. तांबडे रंग विरुन काळोख पसरला. रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांचे दिवे लागले. हॉर्नस अजूनच प्रखर होत गेले. पुष्करला जांभया यायला लागल्या. “आपण का थांबलोय? निघावं आता…” असा अनेकदा विचार केला तरी पाय निघत नव्हता. काही वेळानं सुमेधच्या गाडीची धडधड सुरु झाली. उगाचच आपण फोनवर बोलत थांबलोय दाखवण्यासाठी त्यानं फोन कानाला लावला. काही क्षणातच सुमेधनं मागून गळ्यात हात टाकला आणि वळून बघितलं तर मानसी ढांग टाकून निघूनही गेली होती. सुमेध मानसीच्या cool पणाचं वर्णन करत होता. पुष्करच्या कानात त्याचा आवाज घुमत होता. दोघं parallel गाडी चालवत घरी निघाले होते. बंड गार्डनला जायचंय अशी शुद्ध थाप मारुन पुष्कर आणि सुमेध डेक्कनवरुन म्हात्रे पुलाला चालले होते. अचानक पावसाची सर आली आणि सुमेधनं डावा indicator दिला. पुष्कर त्याच्या तंद्रीतच होता. सुमेधनं त्याला आठवण करुन दिली पुष्करला पावसात भिजण्याचा किती तिटकारा आहे.  पुष्कर मानसीच्या cool पणातून भानावर आला. मग पुष्करनंही डावा indicator दाखवला. दोघं एका शेडमध्ये थांबले. सोबतीला चहा होताच. सुमेध मानसीच्या धाडसाचं, तिच्या बिनधास्तपणाचं कौतुक करत होता. ती कशी आहे, कशी नाहीये याचं वर्णन करत होता. पुष्करनं त्यातून घ्यायचं ते घेतलं. मग धाडसानं विषय काढला. “मला पण bike शिकायचीये रे!” “शीक की मग. कार येते ना चालवता? मग एकदम सोपंय… फारच सोपंय…” पुष्करच्या चेहऱ्यावर smile आली. आपल्याला bike चालवता येत नाही म्हणूनच तिनं आपल्याकडे बघितलं नाही असा त्यानं समज करुन घेतला होता. “पुष्क्या तुला माझ्याकडनं शिकायचीये की तिच्याकडनं शिकायचीये??? आं? आं? आं??? लक्ष होतं माझं… कसं डोळ्याच्या कोपऱ्यातनं बघत होता तू!!!” पुष्कर लाजला. त्यानं खूप control केलं होतं पण नाही जमलं. पुष्करच्या स्वभावाच्या हे अगदीच विरोधात होतं. “हो. तिच्याकडूनच शिकेन आता.” “वाह! पुष्क्या! confidence!!!” “आता तू तर गेल्या १० वर्षात नाही शिकवलीस…” पुष्करनं एकदाच सांगून टाकलं. सुमेधनं शेवटचा भुरका मारुन ग्लास आदळत नंबर दिला… “हे… तिनं मला दिला मगाशी… नंबर… हवाय का?” पुष्करचे डोळे तो कागद बघून विस्फारले!

To be continued…

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: