तुला कोण व्हायचंय हा प्रश्न आपल्या कोणालाच नवीन नाही. शाळेत जेमतेम जायला लागलं, जरासं चुरुचुरु बोलता आलं की आजूबाजूचे सगळे हा प्रश्न विचारायचे. कोणी पायलेट म्हणायचं, कोणी कंडक्टर, कोणी डॉक्टर, कोणी धोबी. प्रत्येक जण त्या त्या कामातून मिळणारे पैसे आणि प्रसिद्धीकडे जराही ढुंकून बघता आपल्याला काय भावतंय त्या प्रमाणे उत्तर द्यायचां. धोबी म्हणणाऱ्याची आई विचारायची की का रे धोबी? तुला डॉक्टर नाही व्हायचं? त्या गोड आवाजातखूप साबण आणि त्याचे खूप खूप फुगे, गार गार पाणी अाणि सगळे वाळत घातलेले, थंडगार हवा करणारे कपडेअसं म्हटलं की आयामावश्याही हसायच्या आणि मग तो विषय तसाच हवेत विरुन जायचा.

आजोबांच्या पिढीत लोकं शिक्षण निवडायचे. सायन्सकॉमर्स. ते निवडलं की पुढे लागेल ती नोकरी. बाबांच्या काळात लोकं प्रोफेशन निवडायचे. डॉक्टर, इंजिनियर, सीए. आता लोकं प्रोफेशन्स बनवतात. हुडकतात. निर्माण करतात. मला तरी माझ्या लहानपणी कुठे माहित होतं की ट्रॅव्हल्स बरोबर फिरायला नेण्याव्यतिरिक्त ही लोकं दुसरं काही प्रोफेशन निर्माण करु शकतात. स्वतः फिरुन इतरांना फक्त घरबसल्या त्याची माहिती वाचायला देऊन त्यावर पैसे कमवू शकतात. ट्रॅव्हलर रायटर असू शकतो. आरशासमोर तासन्तास नटणारी मिनी आज फॅशन स्टायलिस्ट असू शकते की तसं झालं नाहीच तर ती फक्त DIY करुन टाकते आणि फेमस होते. लहानपणी आरशासमोर खूप वेळ रेंगाळल्यामुळे तिचे केस कापणारे बाबा आज अडखळत का होईना पण अभिमानानी सांगतात माझी मुलगी फॅशन ब्लॉगर आहे. लहानपणी अामच्या पिंट्या काय मस्त जोक सांगतो म्हणत त्याला गुंडाळलेल्या पडद्यातून बाहेर काढणारी अाणि चार लोकांवर छू करणारी आई आज तो कमिडियन झाला म्हणताना खूष असेलंच ना?

मग लहान मुलांच्या त्या विश्वात त्यांचं प्रोफेशन असं टपकन येत नसेल असा विश्वास दाखवायला काय हरकत आहे? ते काही ना काही तर्क लावत असतीलंच. त्यांनी दिलेल्या उत्तरावर हसून कानाडोळा करण्यापेक्षा त्या उत्तरापर्यंत त्यांना नेणारा पूल हुडकुया की आपण. त्या उत्तरांना खिडकीतून वाऱ्याच्या झुळूकीसारखं सोडून देण्याएेवजी एखाद्या मखरात बाप्पासारखं सजवून ठेऊया. त्याला दिसत राहील त्याला कोण व्हायचंय.

मोठा हो, मोठ्ठी हो असे आशिर्वाद देताना घरातल्या मोठ्यांना तरी कुठे माहित असतं ते नक्की कोण होण्याचा आर्शिवाद देतायेत? त्यांना एवढंच वाटत असतं की क्रिकेट म्हणालास तर तेंडुलकर हो आणि गाणं म्हणालास तर लता दीदी. पण मंदिरा बेदीची कंमेंट्री एेकायलाही आवडते अाणि माणिक वर्मांची गाणी सुद्धा. सगळ्यांना थोडी बच्चन व्हायची स्वप्न पडतात? मग मोठा म्हणजे जो तुझ्या स्वप्नात आहे तो असूच शकतो. टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करणारा मामा अाणि घरातल्या सगळ्यांची हुबेहुब नक्कल करणारा मामा. तो व्हायचं असेल तर? त्यानी पण खस्ता खाल्या. त्यानी पण तर कमवले पैसे. त्याचं स्वप्न बघायला काय हरकत आहे? तो माझ्यासाठी विसरता चॉकलेट्स आणतो. ही गॅरेंटी मी बच्चनची कशी द्यावी?

आमच्यापेक्षा मोठे व्हा हा अजून एक वेगळाच आशिर्वाद. बापापेक्षा मुलानी कमी कमवलं तर तो फेल्युर आणि जास्त कमवलं तर तो सक्सेसफुल. बापानं शहराच्या मधोमध मजली जंगी बंगला बांधला पण त्यानी बघितलेलं व्हाईट हाऊसचं स्वप्नं अपुरं असेल अाणि मुलानं एका कौलारु घराच्या ठोकळ्याचं स्वप्न पाहून मजली बांधलं तर?

वर्गात ओळीनं उभं केलेल्या माझ्या शाळेतल्या मुलींमध्ये मला आतून दणकट वाटणारी आज बाऊंसर आहे. एक जिम ट्रेनर आहे. तिला तेच व्हायचं होतं. तिच्या शक्तीच्या जोरावर धावणारच करियर हवं होतं. होमसायंस घेतलेली आज एक हाऊसवाईफ आहे, एक शेफ आहे. दोघी अानंदी दिसतात. पायलेट व्हायचं म्हणणारी आज इंजिनियर अाहे पण तिला विमान चालवता येतं. ती चालवते. गंमत वाटेल पण स्कूलबस मधली एक मैत्रीण कायम म्हणायची, “तुला कोण व्हायचंय? मला आई व्हायचंयआम्ही खूप हसायचो, ती पण हसायची. नवरा ठरला नसला तरी तिची मुलांची नावं पण ठरली होती. आज तिला मुलं आहेत. त्यांची तीच नाव आहेत. बहुतांशी आयुष्यात आईवडील व्हावसं वाटण्याची फेज येते. पण तिशीला ज्या आवाजात ठणकावून हे बोलायला मुली लाजतील ते ती स्कूलबसच्या गर्दीत बेधडक सांगायची. आज तिनं ते करुन दाखवलं. आम्ही अजून मान उंचावून ध्येय्याकडे बघतोय ती त्यांच्यासाठी पाळणे गातीये. मागे जाऊन तो हशा पुसता यायला हवा पण तो कायम तसाच राहणार. या आणि अशा खूप आहेत ज्या त्यांच्या मनानी गाठीशी ठरवलेल्या प्रोफेशनमध्ये आहेत, त्यापाशी गुटमळतात किंवा अजूनही स्वप्न बघतात. त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना किंवा त्यांच्या पालकांना याची कितपत जाणीव आहे माहित नाही. पण झुळूक येते, जाते. त्यानी मनातली स्वप्न फक्त शहारतात, गोठत नाहीत.

आपल्याला जे व्हायचंय ते होणं म्हणजे यश. आपल्याला कोणीच व्हायचं नसेल तर प्रवाहात पडूनही कोणीही होऊन दाखवणं म्हणजे यश. बाळाच्या पाळण्यात दिसलेल्या पायाला वर्गीकरण करुन एका गटात टाकणं म्हणजे यश का ते माहित नाही. पण प्रत्येक पाळण्यासाठी एक वेगळा वर्ग निर्माण होणं म्हणजे यश!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: