सध्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर सगळे आपापल्या टाईमलाईन वर एक गोष्ट म्हणत सुटलेत. म्हणतायेत की माझं घर सुरक्षित आहे, तुम्ही माझे मित्र असाल किंवा नसाल तरी माझ्या घरी येऊ शकता. बोलू शकता. मी प्यायला एक कॉफी देईन, रडायला एक खांदा आणि तुमचं दुःख एेकायला दोन कान. खूप चांगली गोष्ट आहे, की अशी काळजी घेणारी, काळजी करणारी लोकं आज आपल्याकडे आहेत. पण मग डिप्रेशन मध्ये जाणारी ही माणसं नक्की कोण आहेत? कशी दिसतात ही? कोणत्या रंगाची असतात? टेंशन घेऊन घेऊन ती निळी पडतात का? की त्यांचे डोळे कायमच रडून रडून सुजलेले असतात? इतरांच्या टाईमलाईन वर असं निमंत्रण येण्याची वाट बघत बसलेली ही माणसं नक्की कोणत्या वेटींग रुम मध्ये बसतात? मला कॅब मध्ये बसल्या बसल्या हे प्रश्न पडत होते. मी रोज किंडल वर एक पुस्तक वाचत आॅफिसला जातो पण आज एक पुस्तक संपलं आणि ५ मिनिटांचा प्रवास उरल्यानं दुसरं सुरु करायला जीवावर आलं होतं. त्यामुळे मी अॉलटाईम टाईमपास उघडला होता.
तर मुद्दा होता बुडत्याला हात देणाऱ्या दानशूरांचा! थोडं मागे जाऊया का? कारण भरगच्च भरलेल्या टाईमलाईन्स डोळ्याखालनं सर्र्र्र्र्रकन सरकल्या की भल्याभल्यांना त्यांच्या कामात परत एकदा डोकं घालायला वेळ लागतो. ह्या वॉल्स आपल्या ओळखीच्या संकल्पना आणि माणसांना एक वेगळं रुप देऊन आपल्याला गदागद हलवून सोडतो. शाळेत नापास झालेला मित्र अमेरिकेत मिनीकूपर घेतल्याचा फोटो टाकतो. आपल्याला पळण्याच्या शर्यतीत हरवलेल्या चपळ मुलाच्या शरीराचा नगारा झालेला असतो. वर्गातल्या सगळ्यात बुजऱ्या मुलीनी आयफेल टॉवर खाली ‘Who Cares’ म्हणत फोटो काढलेला असतो अाणि कॉलेजमध्ये आपल्या खास मैत्रिणीच्या स्कर्टवर संस्कारहीन असल्याचा दृष्टीक्षेप टाकणाऱ्याची बायको बिकिनी मध्ये असते. ते फेमस प्रेमी युगुल इतरांशी लग्न करुन सेटल झालेलं असतं अाणि आपल्या वॉलवर टाकण्यासाठी आपल्याकडे याहून खतरनाक असं काहीच नसतं. खूप वेळ निघून गेलेला असतो, अनेक धक्के बसलेले असतात पण तरीही आपल्याला काहीही न झाल्याप्रमाणे आणि यातलं काहीच महत्त्वाचं नसल्याप्रमाणे आपल्या कामाला जायचं असतं. मख्ख ठेवता येतो तो चेहरा. पण आता या कोलाहलात पडलेल्या डोक्याचं काय करायचं? इतरांची प्रगती किंचीतशी टोचत असते. कोणालातरी आपल्यापेक्षा जास्त लाईक्स येत असतात. मग हळूच कसंसं वाटायला लागतं. समोर एक कॉम्प्युटर असतो अाणि महिनाअखेरीला छानसा पगार असतो. पण याचं कौतुक तेव्हाच उरतं जेव्हा तो पगार उडवून त्याबद्दल आपण वॉलवर टाकतो. सध्यातरी अायफेल टॉवर अाणि मिनीकूपरचा त्रास मोठा असतो. मग बाजूच्या डेस्कवरचं कोणीतरी जोक मारतं अाणि आपल्याला फारसं हसू येत नाही.
घरी यावं तर सगळे आनंदात असतात. बायको पण खास खूश असते. परत एकदा अानंदी अाणि चांगलं वाटतं. मग जेवताना विषय निघतो कोणाच्यातरी मुलाचा, त्याच्या अमेरिकेतल्या घराचा. आई म्हणते बरं झालं तू नाही गेलास. आई बाबांकडे राहण्याचा निर्णय आपणंच घेतलेला असतो. पण म्हणजे मिनीकूपर नको असं तर नाही ना? मग छान अाईस्क्रीम खाऊन पावन झाल्यासारखं होतं. पण आपण हेच आईस्क्रीम वर्षानुवर्ष खातोय अाणि वर्ल्ड टूरवर गेलेला मित्र सगळ्या देशातली आईस्क्रीम्स खात सुटलाय अशी जाणीव होते आणि त्यातच रात्र निघून जाते.
दुसऱ्या दिवशी कॅबमध्ये आपण सोडून सगळे मोबाईलमध्ये असतात. आपण किंडल काढायचं असतं. फेसबुक आणि इंस्टा टाळायचं असतं. पण मग निम्म अंतर गेल्यावर राहवत नाही. बघावं तर आज अजून न बघवण्यासारख्या गोष्टी असतात. ही सगळी मंडळी आनंदातच असतात का? कायम सुखी? ट्रॅफिक, खड्डे, महागाई यांचा मला त्रास होतो अाणि त्यांना मिम्स अाणि भारी कॅप्शनच्या स्टोऱ्या होतात? ह्या मला का होत नाहीत? स्क्रीन बंद होतो अाणि बाजूचा चौकशी करतो, काल दुपारपासून म्हणे माझा चेहरा पडलाय अाणि त्यानी मारलेल्या जोकवर मी हसलो नाही म्हणून माझी विनोदबुद्धी खालावतीये. जे काही असेल. मनातलं प्रश्नांचं जाळं संपत नाहीये.
मागे एकदा बायकोनी शिकवलं होतं, ‘psuedo sense of achievement’. म्हणजे आपल्याला 4 likes आले की खूश व्हायचं, त्यासाठी आपण फारसं काही करायचं नसतं. सारखं कामधंदे सोडून, अर्थात असले तर, काही न काही पोस्ट करत रहायचं. मग माणसाचा जो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायचा नैसर्गिक गुणधर्म आहे, त्यानुसार तो तुमच्या आयुष्यात रस घेतो अाणि तुमचे likes वाढतात. हे एेकून तेव्हा मला हायसं वाटलं होतं. पण आता त्याचा फारसा उपयोग वाटत नव्हता. असं वाटलं कोणाशीतरी बोलावं. कोणाला तरी सांगावं. म्हणावं की मला घ्या तुमच्यात. त्या पार्टीला मला पण न्या. ती hashtag वाली cool पुस्तकं मला पण वाचायला द्या. मी ही फिरायला येईन आणि माझ्या घरच्या बाप्पालाही तुमच्या cool बाप्पांच्या league मध्ये घ्या.
बदललेल्या चेहरा मी पटकन सेल्फी काढून बघू शकतो हे देखील माझ्यासारख्या अडाण्याला सुचत नाही आणि मला इतक्यात तो मेसेज परत दिसतो. निमंत्रणाचा. कोणा एका जागतिक दर्ज्याच्या आनंदित मुलीचा. तिच्या घरी जाऊन तिच्या खांद्यावर डोकं ठेवून, त्या कानात हे प्रश्न विचारावेसे वाटतात. तिच्या हातची कॉफी पिऊन तिलाच म्हणावंसं वाटतं, “मी निळा नाही, काळा नाही, माझे डोळे सुजलेले नाहीत. तरीही मी आनंदी नाही. मला काय खुपतंय मला माहित नाही. दीड दमडीची अक्कल नसलेल्या माणसांचं ते रिकामपण साजरं करणं मला साजरं वाटत नाही. तुम्ही सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला पडलोय. एकटा! एकलकोंडा! यावेळी खरंतर मी एकांताची स्टोरी टाकायला हवी पण दुर्दैवानी एकटेपणाला एकांत म्हणून त्यावर मिरवायचीही माझी कुवत नाही. तुझा मेसेज वाचला आणि इथवर आलो. हेच सांगायला आलोय की, हा निमंत्रणाचा मेसेज असा इथं वाचण्याआधी मी सोशल नेटवर्किंग वरुन non social झालो असतो तर वाचलो असतो बहुतेक!”.
Like this:
Like Loading...
Related
Pseudo Sense of Achievement
Written by सायली केदार

Share this:
Like this:
Related
Posted in लिखाणाचं वेड
सायली केदार
Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.