अाssss” मी कळवळून ओरडले अाणि बाजूच्या दोन बायकांनी माझ्याकडे बघितलं. अरे बापरे! अाता? त्यांना माझी मिशी दिसली तर? मला तशी काही हरकत नसते पण ह्या लोकांना माझ्या मिशीची नको तितकी चिंता असते! अाता ओरडले, तर ओरडलेकारण या पार्लरवालीने माझ्या ओठांच्या वर गरमागरम व्हॅक्स लावून खसकन्ते कापड ओढलं. माझ्या नेहमीची पार्लरवाली अगदी घरगुती अाहे. घरी येऊन सगळं करुन जाते. पण ती नेमकी गावाला गेली ती अाणि हा डिसेंबर उजाडला. लग्नच लग्न. सगळे भेटतात. जवळून बघतात. पहिल्यांदा भेटणारे शंकेनी माझ्या ओठांकडे बघतात. लाज नसेल तर उघड बघतात अाणि असेल तर लिपस्टिकच्या बहाण्यानी. “कित्ती सुंदर शेड अाहे गंकुठून घेतलीस??” परत परत भेटलेले, हिला अजूनही तशीच अाहे का मिशी? हे तपासतात. वयस्कर, मला पाळण्यात वगैरे बघितलेल्या, थोडक्यात मला मिशीशिवाय बघितलेल्या बायका दया दाखवतात… “असू दे गं.. हल्ली काय.. पुरुष केस वाढवतात, बायका टक्कल करतात.. असं काही भेदभाव राहिला नाही!!” गोंधळायला होतं की ह्या बाई नक्की हे मला समजावते अाहेत की स्वतःला? कारण मी माझ्या मिशीवर अजिबात नाराज नाहीतिच्याबरोबर मी अनेक वर्ष काढली अाहेत. रोज अारशात बघतेच की मी मला अाणि पर्यायानी मिशीलाअाता काहींना मस असते, काहींना भेगा असतात, काहींना छातीवर जंगल असतं. मग? ते काय अापल्या शरिरावर चिडायला, स्वतःला नाकारायला लागतात की काय??

स्त्रियांमध्ये असणारी काही हार्मोन्स जर योग्य प्रमाणात तयार झाली तर त्यांना माफक केस येतात पण माझ्या बाबतीत ती गरजेपेक्षा जास्त बनली. पण तरीही मी पूर्णत्वे स्त्रीच अाहे, पुरुष नाही! तसं हे पटवून घ्यायला लोकांना त्रासच झाला. मोकळेपणानी कोणी बोललं नाही कधीपण नजरा दिसतातंच नामाझं स्थळ सुचावायला कुठलीही बाई उत्साहात पुढे अाली नाही. एरवी विवाहमंडळ उघडल्यासारख्या मागे लागलेल्या असतात ह्या. “हिचं काय सांगता येतं? काही गडबड असेल तर?” असा विचार प्रत्येकीनी किमान एकदा तरी केला असणार.

ह्या बायका किंवा माझ्या बिल्डिंगमधले लोकं या सगळ्यांसाठीच धक्का म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालं. जगात असा एक तरी पुरुष निघाला की ज्याला ओठांवरच्या मिशीमागची बाई अावडली, तिचे विचार अावडले अाणि बुद्धी अावडली. माझ्या नवऱ्यानी कधीच भेद केला नाही. प्रसंगी मला घरी लिपव्हॅक्सही करुन दिलं, कारण माझं मला करायला जमत नाही. अाम्ही दोघंच असतो तेव्हा माझ्या मिशीवर सर्रास जोक करतो. अाता नकट्या नाकावर, भद्या ओठांवर लोकं हसतात, मजा करतात अाणि करुनही घेतात, तसंच. मलाही लाज नाहीये हो माझ्या मिशीचीअाता काय करु? मिशी अाहे तर अाहे.

मला इच्छा असतानाही ह्या विषयावर मोकळेपणानी बोलता येत नाही. कुणाला ते पचतच नाही. ह्या बायका जवळ अाल्या की म्हणावसं वाटतं. भादरायला वेळ झाला नाही म्हणून किमान विंचरुन अालीये, असं रोखून बघू नका! पण एखादीचं रॉकेट जायचं वर धक्क्यानी. जेव्हा जेव्हा मी मोकळ्यानी म्हटलंय की मला माझ्या मुलीची काळजी वाटते. तिलाही पुष्कळ जावळ अाहे म्हणजे मिशीही येऊ शकते. तर त्यांच्या भुवया अशा उंचावतात. “एक अाईच अापल्या मुलीचं असं वाईट चिंतते??” माझ्यामते हे practical thinking अाहे. सगळ्यानी चर्चा करुन काही उपाय असेल तर काढावा अािण तिची सुटका करावीपण नाहीअसो!

गंमत माहितीये का? माझ्यावर जळणारे सुद्धा बरेच अाहेत. अाता कसे? अहो माझ्या सोसायटीमध्ये, बसस्टॉपवर अनेक मुलं अाहेत अडनिड्या वयाची. रोज अारशात बघत असणार ही, मिसरुड फुटलं का?? अाता ह्यांना फुटत नाही अाणि माझी खुंटत नाही! ती मुलं माझ्याकडे वळून वळून बघत असतात. एकमेकांच्यात काहीतरी कुजबुजत असतात पण चेहऱ्यावर हेवा दिसतो. मला फार मजा येते बाबा या गोष्टीची.

एकदा काय झालं, मी महिनाभर सुट्टी घेतली होती. माझी मुलगी नुकतीच जन्माला अाली होती. माझा वाढदिवस होता. माझ्या वर्षांच्या सर्विसमध्ये पहिल्यांदाच मी माझ्या वाढदिवसाला अॉफिसमध्ये नव्हते. सकाळची वेळ होती. मुलीला अांघोळ घातली, झोपवलं अाणि डुलकी काढणार तोच फोन वाजला… “Surprise!!! दार उघड!!”… बघते तर दारात माझी अॉफिसची अख्खी टीम!! अाता अाली का पंचाईत? घरीच अाहे गेले चार महिने तर पार्लरला कशाला जाते?? बरं अाईकडे माहेरी गेलेले. कालच अाले परत अाणि ही मंडळी दत्त म्हणून समोर उभी! अाता काय? या अात! “Surprise!!” हा त्यांचा फोनवरचा अावाज एकदम घशात गेला. मला पहिल्यांदा माझ्या भरघोस मिशीसह बघितलं त्यांनीत्या दिवशी मी एकटीच हसले अाणि भरपूर बोलून वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला पण ते जडचं जडच राहिलंअाता मला सांगा इतक्या regularly अापण जातो का हो पार्लरला? पैसे मोजा, वेळ काढा अाणि ठरवून तिथं जानाही होत कधी कधी

पूर्वी बरं होतं.. इतका मोठा नव्हता हा प्रश्न पण अाजकाल अजून एक मॅटर असतोते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे अाणि हे फेसबूक. इतके जवळून फोटो काढतात लोकं की skin pores सुद्धा दिसतील, मग माझी मिशी काय लपते? अाता प्रत्येक जण अापण ज्या फोटोत चांगले दिसतो, तोच फोटो अपलोड करतो. बाकीच्यांची काय माती झाली अाहे त्यात हे बघत सुद्धा नाही. ह्या अप्पलपोटी लोकांच्या फोटोजवर येणाऱ्या शंभर कॉमेन्ट्स्चं खरं क्रेडिट मला जातं. पण ह्या सुंदर मुली ते खसकन्हिरावून घेतात. असो!

कधी कधी मनात विचार येतो की कशा वाटतील सगळ्याच बायका मिशी दाढी सकट? सौंदर्य कमी होईल का त्यांचं? बायकांना असं वाटत नाही की शारिरीक सौंदर्य अाणि बौद्धिक सौंदर्य हे दोन्ही factors असतील परिमाणाचे तर त्यांचं शारिरीक सौंदर्य त्यांच्यावर अन्याय करत नाही का? कसं ओळखायचं की समोरच्यानी नेमकं अापल्याला का निवडलं? मग ते कामाचं ठिकाण असो, लग्न असो किंवा इतर काहीस्त्रियाचं सौंदर्य त्यांच्या पांगळ्या बुद्धीला तारुन नेतं का? पण मला इतकं बरं वाटतं की माझा नवरा माझ्यावर नक्की खरं प्रेम करत असणार कारण मला फसवायला त्याच्याकडे so called सौंदर्याचं शस्त्र नाही.

विचार विचार विचार! विचाऱ्यांच्या पसाऱ्यातच, हळूच डोळे उघडले मीती पार्लरवाली बाई मन अाणि शक्ती लावून खराखर उरलेले केस दोऱ्यानं उपटत होती अाणि नजरेनी मला अारपार भादरत होतीतिची नजर बघून दचकले अाणि जराशी हलले तर ही महामाया ओरडली. “अहो नीट लावून धरा जीभअाधीच केवढे केस अाहेत!!”.. दुसऱ्या वाक्याची खरंच गरज होती का?? की दुसरं वाक्य म्हणता यावं यासाठी पहिलं उच्चारलं होतं?… कधी कधी इतका राग येतो ना या पार्लरवाल्या बायकांचा, अापणंच पैसे मोजायचे अाणि अापल्या असल्या नसलेल्या सौंदर्याचे वाभाडे काढून घ्यायचे. असं वाटतं या सगळ्यांना जोरदार शाप देऊन टाकावा… “पुढच्या जन्मीनाही नाहीयाच जन्मी तुला घोसदार मिशी अाणि भरगच्च दाढी येवो.” पण असो. झालं ते एकदाचं threading… अाणि निघाले मी बाहेर. चप्पल घातली. रिक्षा!!! इतक्यात मागून अावाज अाला… “ताई ताई…” मी अापली चाललीये पुढे.. लक्षच नाही माझंमग मात्र एकदम लक्ष वेधून घेणारी घटना घडलीमागून अावाज अाला, “मिशीवाल्या ताई”… काय टाप माझी मी वळून बघणार नाहीपार्लरमधल्या मुलीनी माझे विसरलेले सुटे पन्नास रुपये अाणून दिले. गंमत एकच वाटते. ही मिशी काही दर्शनीय गोष्ट नाही. ती लोकांच्या डोक्यात बसलेली अाहे. जिनी मला  अात्ता मिनिटांपूर्वी मिशीतून मुक्तता दिली, तिनीच मला हाक मारलीमिशीवाल्या ताई”….

सायली केदार

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: