रंगीबेरंगी आयुष्य जगायची मला मजा येते…
रंगीत आणि बेरंगी!
चित्रातले रंग, आकाशाचे रंग…
रंगीत निसर्ग, माणंस रंगीत…
रंगलेली, रंगवणारी, रंगेल!!
जो तो आपल्या जागी
लेवून एक रंग किंवा अनेक…
काही मूळ, काही मिश्र, काही भेसळ…
काही पडलेले फिके, काही गडद, काही खूपच भडक!!
गडद आणि भडक मधला फरक कळल्यापासून मला भडक रंगच आवडतात…
ते मूळ असतात,
नसले तरी वाटतात किमान!
सहज पुसले जात नाहीत,
दुसऱ्यावर सांडले तर छाप सोडतात…
लपणं जमत नाही सहजासहजी पण लपवणं जमतं त्यांच्या मागे!
नजर वेधून घेतात
पण तितकेच मिसळून जातात एकाच धनुष्यात…
आणि हे रंग ह्यांचे रंग बदलत नाहीत दुरंगी जातीसारखे!
फारच ऊन लागलं तर उघडे पडतात रंगेल माणसाप्रमाणे
आणि होऊन जातात नाहीसे…
त्यांची फक्त आठवण ठेवून!!